Nana Patole | महाराष्ट्रात निवडणुकीसाठी मतदान पार पडले असून सर्वांचं लक्ष आता निकालाकडे लागलं आहे. गेल्या दोन वर्षांतील राज्यातील राजकीय परिस्थिती पाहिल्यानंतर सत्ता स्थापनेवर कोण दावा करणार, याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. मतदान पार पडल्यानंतर विविध एक्झिट पोलकडून वेगवेगळे अंदाज बांधण्यात आले. त्यातच विविध पक्षातील राजकीय मंडळींनीही आता पासूनच विजयाचा विश्वास व्यक्त केलाय. काही ठिकाणी तर हौशी उमेदवारांकडून विजयाचे बॅनर देखील लावण्यात आले आहेत. (Nana Patole )
मात्र, विजयी गुलाल कोण उधळणार याचे चित्र थेट 23 नोव्हेंबररोजी म्हणजेच उद्याच स्पष्ट होईल. राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना होणार आहे. निकालापूर्वीच दोन्ही आघाड्यांकडून सत्ता स्थापनेबाबत दावा केला जातोय. अशात कॉँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे.
नाना पटोले यांचा दावा काय?
नाना पटोले यांनी महाविकास आघाडीत कॉँग्रेसचा विजयी स्ट्राइक रेट सर्वाधिक असणार, असं म्हटलं आहे. यातून त्यांनी कॉँग्रेसचाच मुख्यमंत्रीपदावर अप्रत्यक्षपणे दावा राहणार असल्याचं स्पष्ट केलंय. हरियाणाप्रमाणे महाराष्ट्रात गडबड होऊ नये याची खबरदारी घेतली जात असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
मतमोजणी संदर्भात सर्व उमेदवारांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या मतदारसंघात टफ फाईट आहे तेथे भाजप गडबड करण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण आम्ही ते होऊ देणार नाही, असेही पटोले यांनी सांगितले. ते माध्यमांशी संवाद साधत होते. (Nana Patole )
25 तारखेला सत्ता स्थापनेचा दावा करणार- पटोले
तसेच, पुढे त्यांनी एक्झिट पोलचे आकडे खरे वाटत नाही. आमच्या सर्वेनुसार महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. आज महाविकास आघाडीची बैठक बोलावण्यात आली आहे. आम्ही 25 तारखेला राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा करणार आहोत. तरुणांचा कौल महाविकास आघाडीकडे आहे. यात लाडक्या बहिणींचासुद्धा समावेश असल्याचा दावा पटोले यांनी केलाय.
आमच्यापेक्षा महायुतीमध्ये भांडण आणि स्पर्धा जास्त आहे. शनिवारी निकाल येताच राज्यात मोठ्या घडामोडी घडतील. भाजपसोबत कुणीच राहायला तयार नाहीये. त्यामुळे आम्ही सगळ्या घडामोडींवर बारीक लक्ष ठेऊन आहोत, असं नाना पटोले म्हणाले आहेत. दरम्यान, उद्या 23 नोव्हेंबररोजी निकाल लागणार आहेत. त्यामुळे राज्यात कोण बाजी मारणार ते उद्याच स्पष्ट होईल. (Nana Patole )
News Title – Nana Patole Big claim on power establishment
महत्त्वाच्या बातम्या-
अजित पवार ‘या’ तारखेला CM पदाची शपथ घेणार; बड्या नेत्याचा दावा
सोन्याचा दरवाढीला कौल, दोनच दिवसांत झाली ‘इतक्या’ हजारांची वाढ; पाहा आजच्या किंमती
महाविकास आघाडीला बहुमत मिळणार?, आणखी एका एक्झिट पोलचा निकाल समोर
देवी लक्ष्मी ‘या’ राशीची झोळी सुख व पैशांनी भरवणार?, वाचा राशीभविष्य
महायुती सरकार घासून नाही तर ठासून येणार, ‘या’ नेत्याला विश्वास