नागपूर महाराष्ट्र

हवामान खात्याप्रमाणे एक्झिट पोलचा अंदाजही चुकेल- नाना पटोले

नागपूर | हवामान खात्याप्रमाणे एक्झिट पोलचा अंदाजही चुकेल, असं काँग्रेस नेते नाना पटोले यांनी म्हटलं आहे. ते नागपूरमध्ये पत्रकारांसोबत बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात हवामान खात्याचे अंदाज अनेकदा चुकले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात आज दुष्काळी परिस्थिती असून अर्ध्यापेक्षा जास्त गावात पाण्याची टंचाई आहे, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली संयुक्त पुरोगामी आघाडीला सर्वाधिक जागा मिळतील, असा दावा नाना पटोले यांनी केला आहे.

दरम्यान, नाना पटोले नागपूर मतदारसंघातून नितीन गडकरी यांच्याविरोधात निवडणूक लढवली आहे. यामुळे नागपूर मतदारसंघाच्या निकालाकडे सर्वांच लक्ष्य लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या

-नागपुरात गडकरींचा मी 5 लाखांहून अधिक मतांनी पराभव करणार; पटोलेंचा दावा

-बीडमध्ये बजरंग सोनवणे की प्रितम मुंडे?; ‘न्यूज18’च्या पोलनं वर्तवला अंदाज

-एक्झिट पोल लोकांच्या मनातील नाहीत- रोहित पवार

-अमित शहांकडून एनडीएच्या नेत्यांना दिल्लीत जेवणाचं निमंत्रण

-‘त्या’ ट्विटमुळे ट्रोल करणाऱ्यांना फरानचे सडेतोड उत्तर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या