नाना पटोले पुन्हा स्वगृही, जानेवारीत काँग्रेस प्रवेशाची शक्यता

मुंबई | भाजपच्या खासदारकीचा राजीनामा देणारे नाना पटोले पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. जानेवारी महिन्यात हा प्रवेश होण्याची शक्यता आहे. 

नाना पटोले यांनी मोदींच्या एकाधिकारशाहीला कंटाळून तसेच भाजपच्या शेतकरी धोरणांवर टीका करत राजीनामा दिला होता. त्यानंतर ते अहमदाबादमध्ये राहुल गांधींसोबत व्यासपीठावर दिसले होते. 

दरम्यान, दुसऱ्या कोणत्या पक्षात जाण्याऐवजी नानांनी पुन्हा काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचं कळतंय. तत्पूर्वी भाजपमध्ये गेल्याची चूक केली म्हणून ते महाराष्ट्रभर पश्चाताप यात्रा काढणार असल्याचं कळतंय. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या