बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आरक्षण संपुष्टात आणणं हा भाजप आणि संघाचा डाव”

मुंबई | आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण तापलं आहे. अशातच मराठा आरक्षणावरून केंद्र सरकारने दाखल केलेली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाच्या फेटाळली आहे. यावरून महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

केंद्राने दाखल केलेली मराठा आरक्षणाची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे भाजपचा खोटारडेपणा उघड झाला असून त्यांच्याकडे आता सांगण्यासारखं काही नसल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. त्यासोबतच आरक्षणाचा मुद्दा संपुष्टात आणणे हा भाजपचा आणि आरएसएसचा डाव आहे, असंही नाना पटोले म्हणाले. टिळक भवन येथे माध्यमांशी बोलत होते.

सुप्रीम कोर्टाने फेटाळल्याने आरक्षण देण्याचा अधिकार केंद्र सरकारलाच आहे हे स्पष्ट झाले आहे. 102 व्या घटनादुरुस्तीने राज्यांचे अधिकार केंद्रातील मोदी सरकारने काढून घेतलेले आहेत. त्यामुळे राज्याला आरक्षण देण्याचा कोणताच अधिकार राहिलेला नसतानाही फडणवीस सरकारने आरक्षणचा कायदा केला. तो सुप्रीम कोर्टात टिकू शकला नसल्याचं पटोलेंनी सांगितलं.

दरम्यान,भाजपने मराठा समाजाची आणि विधानसभेचीही दिशाभूल केली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा अधिकार राज्यांना नसल्याचे अधोरेखीत झाल्याने केंद्र सरकारने मराठा समाजाला न्याय द्या, अशी मागणीही पटोलेंनी केली आहे.

थोडक्यात बातम्या- 

“देवाच्या काठीला आवाज नसतो शंभर अपराध भरले की फटका बसतोच, पवारांनी सत्तेचा गैरवापर करुन कारखाना मिळवला”

“स्वच्छ चारित्र्याच्या चंद्रकांत पाटलांच्या पत्रानंतर जरंडेश्वर कारखान्यावर कारवाई झाली, ही कारवाई राजकीय हेतूने आहे”

पवार कुटुंबाने अनेक कारखाने लाटलेत, रोहित पवारांचीही चौकशी करा- भाजप

जरंडेश्वर कारखाना प्रकरणात अजित पवारांचं नाव येताच अण्णा हजारे म्हणाले…

महाराष्ट्रात ईडीच्या मार्फत सत्तांतर करण्याचा डाव???; देवेंद्र फडणवीस म्हणाले…

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More