“प्रत्येक राज्यात राज्यपाल असतो, महाराष्ट्रात ‘भाजपाल’ आहे”
मुंबई | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एका कार्यक्रमात बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यामुळे राज्यपाल पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या निशाण्यावर आले आहे. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी राज्यपालांविरोधात आक्रमक झालेले पाहायला मिळाले.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीतील आमदारांनी राज्यपालांनी शिवरायांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सत्ताधाऱ्यांच्या गोंधळामुळे राज्यपालांनी अभिभाषण अर्ध्यात सोडलं आणि निघुन गेले. त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही राज्यपालांवर टीका केली आहे.
गुरूवारी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांनी राज्यपालांना पुरतं घेरल्याचं दिसलं. तर नाना पटोले यांनी आज ट्विट करत राज्यपालांवर जोरदार निशाणा साधला आहे. प्रत्येक राज्यात राज्यपाल असतो, महाराष्ट्रात मात्र ‘भाजपाल’ आहे, असं खोचक ट्विट नाना पटोले यांनी केलं आहे.
दरम्यान, विधिमंडळातील अभिभाषण अर्धवट सोडून राज्यपाल कोश्यारी निघून गेले हे राज्यपालपदाला शोभणारं नाही. त्यांनी महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेचा अपमान केला आहे, असा घणाघात नाना पटोले यांनी गुरूवारी केला होता.
हर राज्य में राज्यपाल होता है, महाराष्ट्र में ‘भाजपाल’ है|
— Nana Patole (@NANA_PATOLE) March 4, 2022
थोडक्यात बातम्या-
मोठी बातमी! युक्रेनमधून निघालेल्या आणखी एका भारतीय विद्यार्थ्याला गोळी लागली
Audi कंपनीचा ग्राहकांना झटका, घेतला ‘हा’ मोठा निर्णय
रशिया-युक्रेन युद्धामुळे भारत-अमेरिकेत वादाची ठिणगी?, महत्त्वाची माहिती समोर
रशियाने भारतासाठी सहा तास युद्ध थांबवलं?, परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती
कोरोना कायमचा संपला नाही, तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा
Comments are closed.