बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“हक्काचं असताना दिलं जात नसेल, तर मी माझ्या कर्मानं इथला पालकमंत्री बनेल”

पुणे | आपल्या हक्काचं असताना आपल्याला दिलं जात नाही, पण मी माझ्या कर्मानं इथला पालकमंत्री बनेल, अशी शपथ घेतली पाहिजे. आपल्या पक्षाचा माणूस या पालकमंत्र्याच्या खुर्चीवर बसेल ही ताकद घेऊन निघालं पाहिजे, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना सांगितलं.

पुण्याचे पालकमंत्री बारामतीचे आहेत. ते काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं काम करत नाहीत. आपण म्हणतो काँग्रेसच्या संपर्कमंत्र्यांनी लक्ष घालावं, पण आपल्या संपर्कमंत्र्यांचं ऐकायचं की नाही ते तेच ठरवतात. कारण त्यासाठी त्यांचीच सही लागते. कुठल्याही समित्यांवर नावं पाठवायची असतील तर त्याला संपर्कमंत्र्यांची सही चालत नाही. त्यासाठी पालकमंत्र्यांचीच सही लागते. हा त्रासालाच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपली ताकद बनवावी, असं नाना पटोले म्हणाले.

ज्या लोकांना समझोताच करायचा नसेल, सोबत राहून पाठीवर सुराच खुपसायचा असेल तर आपल्याला काहीच बोलायचं नाही, असं म्हणत नाना पटोलेंनी आपली नाराजी व्यक्त केलीये.

स्वबळाबाबत मी जे बोललो त्यात मी माघार घेणार नाही. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपल्या कामाला लागावं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या शिवसैनिकांना कामाला लागा असं सांगितलं. म्हणजे मी स्वबळावर लढण्याबाबत बोलत होतो तर त्रास होत होता आणि आता ते बोलले तर ते ठीक आहे, काही नाही, असं नाना पटोलेंनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या- 

“ईडीसारखी यंत्रणा ही सरकारच्या हातातलं बाहुलं झालंय”

एकनाथ खडसे कधी सीडी बाहेर काढतायत, याची मी वाट पाहतोय- राज ठाकरे

महापालिका निवडणुकांसाठी मनसेच्या मोर्चेबांधणीला सुरुवात; राज ठाकरे दोन दिवस पुण्यात मुक्कामी

विधानसभा अध्यक्षपदाबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

कडक लॉकडाऊन करा किंवा निर्बंध पूर्णतः काढा- राजेश टोपे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More