बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“दिल्लीतील दोन्ही दाढीवाल्यांचे शटर बंद करायचं हेच आपलं लक्ष्य”

पुणे | मागील 70 वर्षांत काँग्रेस पक्षाने मोठ्या कष्टाने देश आणि व्यवस्था उभी केली. मात्र या सरकारने सात वर्षांत एक एक कंपनी, संस्था विकत आहे. त्या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकीत दिल्लीतील दोन्ही दाढीवाल्यांचे शटर बंद करायचे आहे. एवढंच आपल लक्ष्य आहे, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलंय.

कोथरुड येथील नगरसेवक चंदू कदम यांच्यावतीने पाच हजार महिलांचे मोफत लसीकरण मोहिमेचे उद्धाटन रविवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते झालं. यावेळी बोलताना नान पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला.

खोटं बोल, पण रेटून बोल, असे लोक सत्तेमध्ये आले असून मागील सात वर्षांत जी व्यवस्था काँग्रेस पक्षाने उभी केली होती. ती सध्याच्या केंद्रातील सत्ताधारी पक्षाने मोडकळीस आणली, असा घणाघात नाना पटोले यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या दाढीवाल्यांनी सामान्य लोकांना नोटबंदीवेळी लाईनमध्ये लावून मारलं. देशात तेव्हापासूनच महागाई वाढू लागली आहे. आता देशाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी काँग्रेसशिवाय पर्याय नसेल, असं नाना पोटोले म्हणालेत.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात अनेकांचे प्राण गेले. कोरोनाबाबत केंद्रांचे नियोजनच चुकल्याने हे संकट वाढत गेले. मोदींनी अमेरिकेतल्या निवडणूकीवेळी ट्रम्प ला भारतात बोलावून लाखोंची जमवलेली गर्दी कोरोनाच्या फैलावला प्रामुख्याने कारणीभूत ठरली असल्याची टीकाही नाना पटोलेंनी  केली.

थोडक्यात बातम्या-

 काँग्रेस जर स्वबळावर अडून राहिली तर…- जयंत पाटील

18 वर्षावरील सर्वांचं आजपासून मोफत लसीकरण, जाणून घ्या संपूर्ण माहिती

शरद पवार दिल्लीला रवाना; विरोधी पक्षातील विविध नेत्यांना भेटणार

“मागास रिपोर्ट मराठा समाजाचा आरसा, पन्नास टक्के मर्यादेचा मुद्दा संपुष्टात येईल”

‘या’ गावाने करून दाखवलं; 100 टक्के लसीकरण करणारं देशातील पहिलं गाव ठरलं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More