बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“70 वर्षांत जे कमवलं ते सगळं 7 वर्षात विकायला काढलं”

मुंबई | 70 वर्षामध्ये जे कमवलं ते सगळं 7 वर्षात मोदी सरकारने विकायला काढलं आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. मुंबई काँग्रेसच्या वतीने मोदी सरकारच्या 7 वर्षांच्या कार्यकाळाचा निषेध करण्यासाठी निदर्शनं करण्यात आली. यावेळी नाना पटोलेंनी सरकारवर सडकून टीका केलीये.

7 वर्षात मोदी सरकारने 70 वर्षांमध्ये जे कमवलं ते सगळं विकायला काढलं आहे त्यामुळे आम्ही निषेध आंदोलन करतोय. इंधन दरवाढीवर आम्हाला बोलण्या ऐवजी तुम्ही वाढीव कर केंद्रातून कमी करा, 22 टक्के कर का घेतला जातोय, असा सवाल नाना पटोले यांनी राज्यातील भाजपच्या नेत्यांना विचारला आहे.

कोरोना काळात WHO ने काही सूचना केल्या होत्या. पण त्या सुचनांकडे मोदी सरकारने दुर्लक्ष केलं. त्यामुळे देशात कोरोनाची परिस्थितीत बिकट झालीये, असा आरोप नाना पटोले यांनी केला.

आज देशात लस मिळत नाही आहे, पण फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये लस दिली जात आहे, मोदी सरकारचे हे धोरणंच आहे सुटा बुटातील हे सरकार आहे, यांना फक्त श्रीमंत लोकांची काळजी आहे का?, असा सवालही नाना पटोले यांनी उपस्थितीत केला आहे.

थोडक्यात बातम्या- 

…म्हणून आमदार निलेश लंकेंकडून मनसे पदाधिकाऱ्याला 1 कोटी रुपयांची नोटीस

मुंबईतील कोरोना आटोक्यात; वाचा आजची दिलासादायक आकडेवारी

आज महाराष्ट्रात कोरोनाचे किती रुग्ण आढळले?; सर्व आकडेवारी एका क्लिकवर…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जनतेशी संवाद; वाचा संवादातील महत्वाचे मुद्दे

भारतात फेसबुक, इन्स्टाग्राम होणार नाही बंद; गुगल आणि फेसबुकची केंद्र सरकारसमोर शरणागती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More