बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“नरेंद्र मोदी आणि भाजपच्या अहंकारामुळे देशाची स्मशानभूमी बनली”

रायगड | केंद्र सरकार कोरोनाला रोखण्यात अपयशी ठरल्याचा आरोप वारंवार विरोधकांकडून केला जात आहे. देशातील कोरोना परिस्थितीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

नाना पटोले यांनी आज रायगडमध्ये चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. अलिबागमधील नवगाव इथं मच्छिमारांसोबत संवाद साधत नुकसान झालेल्या बोटी, त्याचबरोबर वरसोली इथं रमेश नाईक यांच्या नारळाच्या बागेची, वावे पडलेल्या घराचीही त्यांनी पाहणी केली. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना पटोलेंनी मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची थट्टा करण्याचं काम केंद्र सरकारनं आणि भाजपनं केलं. नरेंद्र मोदी आणि भाजपच्या अहंकारामुळेच आज देशाची स्मशानभूमी बनली आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे. तसेच केंद्र सरकारचा ढिसाळपणा, नियोजन शून्यता, जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या नियमांचं पालन न करणं, यामुळेच देश स्मशानभूमी बनलीय. देशातील कोरोना स्थितीमुळे पंतप्रधानांवर जागतिक पातळीवर टीका होत असल्याचंही नाना पटोले यांनी म्हटलंय.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी त्यांच्या वाराणसी मतदारसंघातील डॉक्टरांशी संवाद साधला. यावेळी मोदी अत्यंत भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. मोदी भावूक होऊ शकतात यावर विश्वास बसत नाही. मोदींचं खेला होबे सुरु होतं. देशाला स्मशान केलं आणि आज ते भाऊक होत असतील यावर विश्वास बसत नाही, असा टोला नाना पटोले यांनी मोदींना लगावलाय.

थोडक्यात बातम्या- 

“राज्य सरकार बरखास्त करा आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा”

मास्क नीट न लावल्यामुळे पोलिसांनी चक्क 18 महिन्याच्या मुलाला केला दंड अन्…

दीराच्या प्रेमात आकंठ बुडाली; त्यानंतर तीनं जे पाऊल उचललं ते अत्यंत धक्कादायक!

“…त्यासाठीही पंतप्रधान नरेंद्र मोदी टाळ्या-थाळ्या वाजवण्याची घोषणा लवकरच करतील”

प्रसिद्ध जेष्ठ संगीतकार विजय पाटील यांचं निधन!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More