नागपूर | पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत काँग्रेस नेते गुलाब नबी आझाद यांच्याविषयी बोलताना भावूक झाल्याचं पहायला मिळालं. नरेंद्र मोदी गुलाब नबी आझाद यांच्याबाबात बोलत होते तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. यावेळी बोलताना मोदींनी गुलाब नबी आझाद यांचा एक किस्सा देखील सांगितला. यावरून नवनिर्वाचित काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदींवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.
दिल्लीत गेल्या 77 दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. त्या आंदोलनातील शेतकरी नेते राकेश टिकैत यांचे अश्रू भाजपला दिसत नाहीत का?, असा सवाल करत नाना पटोले यांनी नरेंद्र मोदींचे अश्रू मगरीचे असल्याची टीका केली आहे.
नरेंद्र मोदी यांनी नटसम्राट व्हावं, चित्रपटात काम करावं. लोकतंत्रात असा ड्रामा चालत नाही, अशी बोचरी टीका नाना पटोले यांनी नरेंद्र मोदींवर केली. नाना पटोले प्रदेशाध्यक्षपदी नेमणूक झाल्यानंतर पहिल्यांदा नागपूरमध्ये आले. यावेळी बोलताना नाना पटोले यांनी नरेंद्र मोदींवर जोरदार टीकास्त्र सोडलं. तसेच नवा विधानसभा अध्यक्ष कोण होणार हे हायकमांड ठरवेल, असं नाना पटोले यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर नाना पटोले यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. यावेळी माध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी काँग्रेस पक्षाला राज्यातला एक नंबरचा पक्ष बनवणार आणि त्यासाठी वाटेल ते कष्ट घेणार असं म्हटलं होतं.
थोडक्यात बातम्या-
पुण्यातील स्नेहल काळभोर अवघ्या 21 व्या वर्षी झाली सरपंच!
गोल्डनमॅन असणं ठरतंय शाप; ‘या’ चार गोल्डनमॅनला मृत्यूनं अकाली गाठलं!
तरुणीचा लग्नाला नकार, ‘प्रपोझ डे’ दिवशी तरुणाने उचललं धक्कादायक पाऊल
आम्ही कुणाला घाबरत नाही, जे बोलायचं ते छातीठोकपणे बोलतो- चंद्रकांत पाटील
“नरेंद्र मोदींनी नटसम्राट व्हावं, लोकतंत्रात असा ड्रामा चालत नाही”