बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“नागपूरचा विकास पहिल्या पावसात भिजून गेला”

नागपूर | नागपूरमध्ये झालेल्या जोरदार पावसानंतर नागपूरच्या विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचल्याचं चित्र आज पाहायला मिळालं. त्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन नागपूरच्या पहिल्या पावसाचे फोटो शेअर करत नागपूरचा विकास पहिल्याच पावसात भिजून गेल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, काँग्रेस पक्षाने सध्या केंद्र सरकारच्या इंधन दरवाढ व महागाई विरोधात दहा दिवसांचं आंदोलन पुकारण्यात आलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर नाना पटोले हे आज नागपूरमध्ये सायकल रॅलीत सामील झाले होते. आजचा नागपूर मध्ये झालेल्या पहिल्या पावसातच नागपूरचा विकास पूर्णपणे भिजून गेल्याचं ट्विट करून नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

नाना पटोले यांनी नागपूरच्या पहिल्या पावसाचे फोटो शेअर करत त्या फोटोला विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही टॅग केलं आहे. यादरम्यान, नाना पटोले यांनी केलेल्या टीकेला देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नेमकं कसं प्रत्युत्तर मिळणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पहिल्याच पावसात नागपूर बेहाल झालं असून नागपूरचा विकास पहिल्याच पावसात भिजून गेल्याचं नाना पटोले यांनी म्हटला आहे त्यामुळे आता नाना पटोले यांनी पुन्हा एकदा भाजपवर थेट नाव न घेता टीका केल्याचं स्पष्टपणे पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या – 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More