बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

हिवाळी अधिवेशनापूर्वी नाना पटोले थेट दिल्लीत, राजकीय हालचालींना वेग

मुंबई | आजपासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (winter season maharashtra 2021) मुंबईत सुरू होतं आहे. त्यामुळे अधिवेशन सुरु होण्याआधीच अनेक आरोप-प्रत्यारोप पहायला मिळाले. या अधिवेशनाच्या निमित्ताने भाजप (bjp) आणि महाविकास आघाडीचे (MVA) नेते आता आमनेसामने येणार आहे. त्यामुळे या पाच दिवसांच्या अधिवेशनात काय होणार याकडे सगळ्याचं लक्ष लागून आहे.

हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात येणार असून या पदासाठीच्या इच्छुकांमुळे काँग्रेसला अडचणी आल्या आहेत. त्यमुळे काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole) यांनी थेट दिल्ली गाठली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पहिले पटोलेंनी दिल्ली गाठल्यानं चर्चांना एकच उदान आलंय.

अध्यक्षपदासाठी आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopte)यांच्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र ऐनवेळी आणखी एका मोठ्या नेत्यानं इच्छा व्यक्त केल्यानं काॅंग्रसेमध्ये खलबतं सुरु आहेत. त्यामुळे आता हिवाळी अधिवेशन चांगलंच रंगणार असल्याचं चित्र आहे.

दरम्यान, विधिमंडळ हिवाळी अधिवेशनापूर्वी महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकीत महाविकास आघाडी सरकारचे घटक पक्ष विरोधी भाजपला कसं रोखायचं यासंदर्भात चर्चा करु शकतात. त्यामुळे आता अधिवेशनात काय घडामोडी घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या – 

MPSC Exam: इच्छुकांसाठी सुवर्णसंधी; राज्य सरकारमध्ये तब्बल ‘इतक्या’ पदांसाठी मेगाभरती सुरू

‘…म्हणून दारु दर कमी केले’; अजित पवारांनी सांगितलं कारण

‘महाराष्ट्राला रामभरोसे ठेवता येणार नाही’; चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला

Omicronचा वेग डेल्टाच्या तिप्पट; ‘या’ राज्यातील फैलावामुळे चिंता वाढली

चिंताजनक! Omicronच्या धास्तीनं अनेक राज्यांत ‘या’ गोष्टीवर घातली बंदी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More