Nana Patole | लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचं लक्ष हे लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे लागलं होतं. राज्यात महाविकास आघाडीने 30 जागांवर विजय मिळवला आहे. तर महायुतीने 17 जागांवर विजय मिळवला आहे. अशातच आता लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानसभेचे वारे वाहू लागले आहेत. यामध्ये 30 पैकी सर्वाधिक जागा या काँग्रेसने जिंकल्या. तब्बल 13 जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे. त्यामुळे आता काँग्रेस नेत्याचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करत बॅनरबाजी करण्यात आली आहे. (Nana Patole)
नाना पटोले भावी मुख्यमंत्री
काँग्रेस पक्षाने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक मताने बाजी मारली. यामुळे आता राज्यातील काँग्रेसचे नेते नाना पटोले (Nana Patole) यांची भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनरबाजी करण्यात आली. त्याची सध्या जोरदार चर्चा होत आहे. विधानसभा निवडणूक ही दिवाळीच्या तोंडावर होण्याची शक्यता आहे. याची सुरूवात ही आतापासून पाहायला मिळत आहे.
लोकसभा निवडणुकीतील यशामुळे सर्वाधिक यश हे काँग्रेस पक्षाला मिळालं आहे. यामुळे आता नाना पटोले (Nana Patole) यांच्या भावी मुख्यमंत्री पदाच्या बॅनरबाजीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. ही बॅनरबाजी नागपूरात करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.
2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसला केवळ एकच जागा जिंकता आली होती. आता 2024 च्या लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसच्या 13 जागा निवडून आल्या आहेत. आता महाविकास आघाडीतील काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरला असल्याचं बोललं जात आहे.
नाना पटोलेंव्यतिरिक्त ‘या’ नेत्यांची बॅनरबाजी
याआधी देखील महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांची बॅनरबाजी करण्यात आली होती. खासदार सुप्रिया सुळे यांची देखील भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनरबाजी करण्यात आली होती. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते जयंत पाटील यांची देखील बॅनरबाजी करण्यात आली होती. अशातच आता नाना पटोले यांची भावी मुख्यमंत्री म्हणून नागपूर येथे बॅनर झळकले आहेत.
News Title – Nana Patole Future CM Of Maharashtra Banner At Nagpur
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार?; ‘इतके’ आमदार शरद पवारांकडे परतणार?
“माझ्या मुलाला मारण्यासाठी त्यांनी..”; निलेश लंकेंच्या आईच्या आरोपांनी खळबळ
चिन्हामुळे झाला घोळ; शशिकांत शिंदेंच्या पराभवाचं कारण समोर
धक्कादायक! पुण्यातील ‘या’ भागात पूरसदृश्य पाऊस, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
महाराष्ट्रातील पराभव जिव्हारी! फडणवीसांनंतर ‘या’ नेत्यानेही घेतला मोठा निर्णय