बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“ज्याचं जळतं त्यालाच कळतं, लोकांच्या डोळ्यातील अश्रूंवर राजकारण करू नका”

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारपासून राज्यात संचारबंदीची घोषणा केली आहे. तर त्याचबरोबर त्यांनी राज्यसरकारच्या खात्यातून काही क्षेत्रातील कामगारांना आर्थिक सवलती दिल्या आहेत. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली होती. सरकारने जाहिर केलेलं पॅकेज हे निव्वळ जनतेच्या डोळ्यात धूळफेक आहे, असं फडणवीस म्हणाले. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीसांना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.

आज राजकारणापलीकडे जाऊन लोकांचा जीव वाचवणं हे सर्वांचं कर्तव्य असलं पाहिजे. अनेक परिवारातील कर्ते लोकं मरण पावले आहेत. त्यांच्या डोळ्यांतले अश्रू आम्ही पाहिले आहेत. ज्याचं जळतं त्यालाच कळतं. त्या अश्रूंवर राजकारण करू नका, असा सल्ला नाना पटोले यांनी भाजपला दिला. फडणवीस यांनी सरकारने आखलेल्या आर्थिक धोरणावर टीका केली होती. यावरून नाना पटोले यांनी फडणवीस यांना महाराष्ट्राच्या वाट्याचे असलेले 90 हजार कोटी मिळवून देण्याचं आव्हानं दिलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांचं केंद्रात वजन नाहीये, हे मला माहिती आहे. कारण त्यांच्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. पण त्याचं जर खरंच वजन असेल तर, त्यांनी महाराष्ट्राच्या वाटेचे केंद्रात अडकलेले 90 हजार कोटी रूपये मिळवून द्यावे, असं आव्हान त्यांनी फडणवीस यांना दिलं. त्याचबरोबर कोरोनाच्या गंभीर परिस्थितीत राजकारण न करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.

दरम्यान, देशात सगळीकडे कोरोना पसरू लागला आहे आणि देशाचे पंतप्रधान काय करत आहेत. त्यांना निवडणूकीच पडलंय. जनता इथे कोरोनाने त्रस्त आहे तर पंतप्रधान मस्त आहेत, अशी टीका देखील त्यांनी मोदींवर केली.

थोडक्यात बातम्या-

पुढील दोन दिवसांत राज्यातील ‘या’ भागात पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज

मुंबई-कोलकाता सामन्यात असं काय झालं की, शाहरूख खानला मागावी लागली माफी !

‘…तरच रेमडेसिविरचा वापर करा’; कोविड टास्क प्रमुखांनी डॉक्टरांना हात जोडून केली विनंती

“आखिर तुम केहना क्या चाहते हो?” निलेश राणेंना आठवला 3 इडियट्सचा डायलाॅग

‘महाराष्ट्र सरकारने आधार कार्ड पाहून रुग्णांवर उपचार करावे’; ‘या’ काँग्रेस नेत्याची मागणी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More