बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नाना पटोलेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिला ‘हा’ सल्ला, म्हणाले…

मुंबई | उद्धव ठाकरेंनी चांगलं काम केलं आहे. टीका सहन करून कठोर निर्णय घेतले, याचं कौतुक आहे. परंतु आमदारांच्या पत्रांना उत्तरे दिली जात नाहीत. ती द्यायला हवीत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेत. ‘लोकमत’च्या ‘फेस टू फेस’ कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे.

बाळासाहेब थोरात सरळ व्यक्तिमत्त्व आहे. कुणाचं मन आपल्यामुळे दुखावलं जाऊ नये, असा त्यांचा प्रयत्न असतो. पण महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना जास्त निधी दिला जातो, असा आरोप आहे. काँग्रेस आमदारांना निधीचं वाटप कमी होतं. काँग्रेसच्या हिश्श्याचं जे काही आहे ते मिळालं पाहिजे. त्यामुळे बाळासाहेब थोरातांनी काँग्रेसच्या आमदाराला जास्त निधी मिळेल यासाठी भांडावं, अशी सूचना पटोलेंनी केली.

देवेंद्र फडणवीस हे उत्तम प्रशासक आहेत. मुख्यमंत्री असताना त्यांनी गृहमंत्रिपदही सांभाळलं होतं. ते खाते वापरण्यात आणि प्रशासन चालवण्यात ते ‘एक्सपर्ट’ आहेत, अशी पाठ थोपटतानाच, काही घरं सोडायची असतात, असा सल्लाही नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीसांना दिला.

दरम्यान, माझ्या घरात कुणी राजकारणी नाही. जानेवारी 1992 मध्ये मी जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसकडे तिकीट मागितलं होतं, पण त्यांनी दिलं नाही. घरातूनही कुठली मदत झाली नाही. तरीही मी रिंगणात उतरलो आणि जनतेच्या आशीर्वादाने निवडणूक जिंकलो. त्यावेळी भ्रष्टाचाराविरोधात काम करायचं. संस्था, कारखाने काढायचे नाहीत, असं वडिलांनी बजावलं होतं. हा मंत्र आज माझ्या कामाला आला, असं नाना म्हणालेत.

थोडक्यात बातम्या- 

‘तालुक्यात विकास केल्यामुळं मला शांत झोप लागते’; भरणेंचा हर्षवर्धन पाटलांना टोला

जर कोणी धर्माची मस्ती घेऊन माझ्यासमोर उभा राहिला तर मी…- उद्धव ठाकरे

आरोग्यमंत्री रूग्णालयात फोटोग्राफर घेऊन आले अन् मनमोहन सिंग यांची मुलगी संतापली

‘सरकारी नोकऱ्याच नाहीत तर आरक्षण कुठून देणार?’; नितीन गडकरींचं रोखठोक मत

“मुख्यमंत्रीपद गेल्यावर दोन माणसंही भेटायला येत नाहीत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More