बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“नेमका ‘हाच’ फरक आहे भाजप आणि काँग्रेसच्या विचारधारेतला”

पालघर | गेल्या काही दिवसांपासून दिल्ली सीमेवर शेतकरी आंदोलनमुळे केंद्रातील मोदी सरकारला टीकेचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला अनेक राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला होता. काँग्रेसने देखील भाजपवर आक्रमकपणे टीका केली होती. त्यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर टीका केली होती. त्यानंतर आता पुन्हा नाना पटोले यांनी भाजपवर टीका केली आहे.

एकीकडे राजीव गांधीजींनी महिलांना सत्तेच्या भागीदारीत आणलं. पुरुषांच्या बरोबरीने उभं केलं. तर दुसरीकडे उजज्वाला योजना आणून तुमच्या घरातले पैसे लुटून मूठभर लोकांकडे पाठवण्याची व्यवस्था मोदी सरकारने केली. हाच नेमका फरक आहे काँग्रेस आणि भाजप विचारधारेतला, असं नाना पटोले म्हणाले आहेत.

नाना पटोले यांनी वसई येथे पालघर जिल्हापरिषद व पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेत उपस्थितांना मार्गदर्शन केलं. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे सर्व उमेदवार प्रचंड मतांनी विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राज्यातील वातावरण तापलेलं दिसत आहे. काँग्रेस, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी आता एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहे. त्यामुळे आता येत्या काळात राज्यात राजकीय रंगाची उधळण होण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या-

गेल्या दोन दिवसांत सोन्याच्या दरात मोठी घसरण, वाचा ताजे दर

‘जर एखादं गटारातून बाहेर येत नाल्यात पडत असेल तर…’; कन्हैया कुमारच्या पक्षांतरावर भाजपची टीका

‘या’ गोष्टीमुळे गुगलचे मॅनेजर सुंदर पिचई दिवसभर असतात एनर्जेटीक, जाणून घ्या!

‘बांधावर जायच्या आधी जयंत पाटील चंद्रावर…’; गोपीचंद पडळकरांचं टीकास्त्र“गोवा ड्रग्ज माफियांच्या ताब्यात अडकला आहे, तिकडे जाणं गरजेचं”

“शेतकरी उद्धवस्त, उभी पीकं पाण्याखाली, औरंगाबाद जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More