बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“त्यांच्या बापाशी लढून मी पक्षाबाहेर पडलोय, नाना पटोले कुणाच्या…”

नागपूर | काही दिवसांपूर्वी काँग्रेसने (Congress) अचानक नागपूर विधानपरिषदेचा उमेदवार बदलला होता. त्यामुळे भाजपने काँग्रेसवर कडाडून टीका केली होती. त्यावेळी भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bavankule) यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana patole)यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यावर आता नाना पटोले यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. (Nana Patole has given reply to Chandrasekhar Bavankule)

नाना पटोले हे हतबल झाले आहेत. दोन मंत्र्यांच्या दबावाखाली नाना पटोले यांनी काँग्रेसने उमेदवार बदलला. त्यामुळे नाना पटोले यांनी राजीनामा द्यावा, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं होतं. त्यावर “नाना पटोले कुणाच्या दबावात येत नाही, तर दबाव टाकतो”, असं उत्तर नाना पटोले यांनी दिलं आहे.

ज्यांनी हा आरोप केलाय. त्यांच्या बापाशी लढून मी त्या पक्षामधून बाहेर पडलोय. हे त्यांनी विसरू नये, असं रोखठोक उत्तर देखील त्यांनी यावेळी दिलं आहे. आमच्यावर टीका करणारे आणि आपला राजीनामा मागणारे चंद्रशेखर बावनकुळे कोण आहेत?, असा सवाल देखील त्यांनी विचारला आहे. त्याचबरोबर त्यांनी आगामी निवडणुकांवर देखील भाष्य केलं आहे.

दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांवर अनेकांनी बहिष्कार घातला आहे. हे लोकशाहीसाठी घातक आहे.  त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सरसकट रद्द कराव्यात, अशी काँग्रेसची भूमिका असल्याचं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

कपिल देवची इंग्रजी ऐकली का? 83चा व्हिडीओ तुफान व्हायरल; पाहा व्हिडीओ

Second Dose घेतलाय का? नसेल तर भरावा लागणार 500 रूपये दंड

मराठवाड्याचं टेंशन वाढलं! ‘या’ शहरात आढळला Omicronचा रूग्ण

“जेव्हा औरंगजेब येतो, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज उभे राहतात”

श्रीनगरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला, 14 जवान जखमी तर 5 गंभीर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More