माजी खासदार नाना पटोलेंनी अखेर धरला काँग्रेसचा हात

नवी दिल्ली | भाजपला सोडचिठ्ठी दिलेले माजी खासदार नाना पटोले यांनी अखेर पुन्हा एकदा काँग्रेसचा हात हातात घेतला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं.

काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भात माहिती देण्यात आलीय. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, काँग्रेस प्रभारी मोहन प्रकाश आणि संजय निरुपम उपस्थित होते. 

भाजपमध्ये मनमानी सुरु असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला होता. तसेच मोदी सरकारची शेतकऱ्यांविषयीची धोरणं चांगली नसल्याचं टीकास्त्रही त्यांनी सोडलं होतं.