बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

”नाना पटोले काहीही बोलतात, नाना असे व्यक्ती आहेत जे…”

मुंबई | राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर आरोप करणारे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना एनआयएनं ऑगस्ट महिन्यामध्ये अनेकदा चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावलं आहेत. परंतु परमबीर सिंह चौकशीसाठी आलेच नाहीत. यावरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी भाजपवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

भाजपवर टीका करत असताना परमबीर सिंह हे यांना भारताबाहेर जाण्यासाठी केंद्राने मदत केल्याची खोचक टीका नाना पटोलेंनी केली होती. यावर नाना पटोले काहीही बोलत राहतात, त्यांच्या प्रत्येक गोष्टीचं उत्तर देता येणार नाही, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.

नाना पटोलेंवर घणाघात करत असताना नाना पटोले हे असे व्यक्ती आहेत जे अमेरिकेच्या अध्यक्षांच्या बाबतीत देखील बोलू शकतात, असं सुद्धा फडणवीसांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राज्य सरकारने ज्या वेळी परमबीर सिंह यांच्यावर कारवाई करण्याचं ठरवलं होतं. तेव्हा ते मुंबई सोडून चंडीगडमध्ये रहायला गेले होते. त्यावळी वैद्यकीय कारण दिलं होतं. परमबीर सिंह सध्या रशियात असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत.

थोडक्यात बातम्या-

स्मृती मंधानाचं ऐतिहासिक शतक! अशी कामगिरी करणारी पहिली महिला क्रिकेटर

“कार्यकर्त्याचा अपमान मला मान्य नाही, काहीही अडचण आली तर फोन करा”

लहान मुलांसाठी महत्त्वाची बातमी ! पुण्यात ‘या’ लसीची ट्रायल सुरू

बाबो! बिस्कीट खाल्लं नाही तर मुलांच्या जीवाला धोका; ‘या’ शहरात पसरली अफवा अन्…

“चंद्रकांत पाटलांनी 15 डिसेंबरची मुदत दिली होती, म्हणजे 6 महिने…”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More