Nana Patole | कार्यकर्त्यांचा आपल्या पक्षावर आणि नेत्यांवर जास्तच जीव असतो. कार्यकर्ते आपल्या पक्षासाठी आणि नेत्यांसाठी काहीही करतील. ते कोणत्याही थराला जातील हे आपण बीड लोकसभा मतदारसंघात पाहिलं आहेच. मात्र आता काँग्रेस नेते नाना पटोलेंच्याबाबतीत देखील हे घडलं आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) हे अकोले जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. ते वाडेगाव येथील एका कार्यक्रमासाठी आले होते. या कार्यक्रमासाठी नाना पटोले (Nana Patole) यांनी मुक्कामी असलेल्या संत गजानन महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतलं. यावेळी पावसाने मोठा चिखल झाला होता. यामुळे नाना पटोलेंंचे (Nana Patole) पाय चिखलाने माखले होते.
पटोलेंचे चिखलाने माखलेले पाय कार्यकर्त्याने धुतले
गजानन महाराजांचे दर्शन घेण्यासाठी नाना पटोले जात होते. त्यावेळी त्यांनी चिखलातून मार्ग काढत त्यांनी गजानन महाराजांचं दर्शन घेतलं. मात्र दर्शनानंतर आपल्या गाडीजवळ नाना पटोलेंचे पाय चिखलाने माखलेले होते. ते माखलेले पाय हे एका कार्यकर्त्याने धुतले. विजय गुरव असं त्या कार्यकर्त्यांचं नाव असून तो बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील रहिवासी आहे.
कार्यकर्त्याने नाना पटोलेंचे पाय धुतल्याच्या कृत्याने आता नवीन वादंग होण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही. याचा परिणाम हा राजकीय वर्तुळामध्ये देखील होताना दिसला आहे. यावर आता अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी नाना पटोलेंवर हल्लाबोल केला आहे.
अमोल मिटकरींचा नाना पटोलेंवर हल्लाबोल
नाना पटोले यांचे चिखलाने माखलेले पाय एका कार्यकर्त्याने धुवून काढल्याने एकच खळबळ उडाली आहे. नेते अशाचप्रकारे कार्यकर्त्यांचा वापर पाय धुवून घेण्यासाठी करत असतील हे कृत्य निंदणीय आहे, यामुळे पक्षातील कार्यकर्त्यांप्रती काय धारणा आहे हे लक्षात येतं, असं अमोल मिटकरी म्हणाले आहेत.
पालखी सोहळ्याच्या निमित्ताने हा पहिल्यांदाच प्रकार घडताना दिसला आहे. हा अतिशय संतापजनक प्रकार असून नेत्यांनी कार्यकर्त्यांमध्ये पाय धुवून घेणे, हा कार्यकर्त्यांचा एकप्रकारे अपमान आहे. नाना पटोलेंनी स्वत:ला आणि कार्यकर्त्याला नोकर समजू नये, अशी बोचरी टीका अमोल मिटकरींनी केली आहे.
News Title – Nana Patole Muddy Feet Was Wash Congress Karyakarta
महत्त्वाच्या बातम्या
मोठी बातमी! प्रसिद्ध गायिका अलका याग्निक दुर्मिळ आजारानं त्रस्त, दोन्ही कान..
“छगन भुजबळांचं उभं आयुष्य गोरगरीबांचं आरक्षण हिसकावण्यात गेलंय”
“विठ्ठलाच्या नावाने दरोडा…”, जितेंद्र आव्हाडांचा सरकारला टोला
अजितदादांचं भाजपला होतंय ओझं?, अजितदादांबाबत पुनर्विचार होणार…
शेअर बाजारने गाठला ऐतिहासिक उच्चांक! काय आहे रेकॉर्ड ओपनिंग लेव्हल