बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भाजप फुटीच्या उंबरठ्यावर, ‘हे’ नेते माझ्या संपर्कात”; काँग्रेस नेत्याच्या दाव्यानं खळबळ

मुंबई | भाजप सध्या फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचा धक्कादायक दावा काँग्रेस नेत्याकडून करण्यात आला आहे. हे काँग्रेस नेते दुसरे तिसरे कुणी नसून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आहेत. 12 विधान परिषद सदस्यांच्या रखडलेल्या नियुक्त्यांवर बोलताना नाना पटोले यांनी हा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्याची राज्याच्या राजकारणात चांगलीच चर्चा रंगली आहे. विशेषतः काँग्रेस-राष्ट्रवादीतून आयात केलेले नेते आपल्या संपर्कात असल्याच्या त्यांच्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे.

विधान परिषदेवर आमदार नियुक्त करण्यासाठी महाविकास आघाडीने 12 जणांच्या नावांची यादी राज्यपालांना दिली आहे, मात्र राज्यपालांनी अद्याप या यादीला मंजुरी दिलेली नाही. या मुद्द्यावरुन गेल्या काही दिवसांपासून राज्यपाल विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष बघायला मिळत आहेत. त्यातच नाना पटोले यांनी केलेल्या दाव्यांमुळे एकच खळबळ उडाली आहे.

राज्यपालांनी विधान परिषदेत महाविकास आघाडीच्या 12 आमदारांची नियुक्ती केली तर भाजपमधून अनेक जण बाहेर पडतील, अशी भीती आहे, ही फूट थांबवण्यासाठी राज्यपालांचा वापर होत आहे, असं मी याआधीच अनेकदा म्हटलं आहे. भाजप पक्ष सध्या फुटीच्या उंबरठ्यावर असल्यामुळे राजभवनाचं रुपांतर भाजप कार्यालयामध्ये झालं आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

मागच्या काही काळात भाजपने अनेक नेत्यांना आयात करुन ठेवलं आहे. भाजपमधीलही काही आमदार आहेत, आपण आता काही मंत्री होत नाही, असं त्यांना कळून चुकलं आहे. आमचं सरकार येणार असा दावा भाजपकडून केला जातोय, मात्र दोन वर्षे झाली तरी त्यांना ते जमलं नाही म्हणून त्यांच्या आमदारांमध्ये चलबिचल सुरु झाली आहे. ते आता फुटणार आहेत. भाजप तसेच काही इतर आमदारही माझ्या संपर्कात आहेत, असा दावाही नाना पटोले यांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या-

‘या’ अधिकाऱ्यांच्या मुलांना मिळणार नोकरी!, राज्य सरकारची मोठी घोषणा

महाराष्ट्रात ‘या’ वेळेत पुन्हा संचारबंदी?, केद्रानं दिल्यात स्पष्ट सूचना

‘बुलेटबंदी’ गाण्यावर रुग्णालयात नर्सचे ठुमके, आता मात्र सापडलीय संकटात!

डिझेलवर चालणाऱ्या गाड्या बंद होणार?, नितीन गडकरींची वाहन उत्पादकांना मोठी सूचना

राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेट नाकारली?, राजकीय वर्तुळात एकच चर्चा

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More