मुख्यमंत्र्यांवर हत्येचा गुन्हा दाखल करा; नाना पटोलेंची मागणी

नागपूर | धर्मा पाटील यांच्या मृत्यूस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे जबाबदार आहेत. त्यांच्यावर कलम 302 अंतर्गत मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी भाजपमधून काँग्रेसवासी झालेल्या नाना पटोले यांनी केलीय. 

पाटील यांच्या भूखंडाशेजारीच पालकमंत्री जयकुमार रावल यांनी भूखंड घेतलाय. अशीच भूमिका राहिली तर शेतकरी तुम्हाला सोडणार नाहीत, असा इशाराही पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना दिलाय. 

तर दुसरीकडे भाजपची शेतकरीविरोधी व्यवस्था आणखी किती शेतकऱ्यांचे बळी घेणार? असा सवाल माजी मंत्री अनिल देशमुख यांनी विचारलाय.