मुख्यमंत्र्यांनी माझ्या वाटेला जाऊ नये, एवढीच त्यांना सूचना!

नवी दिल्ली | मुख्यमंत्र्यांनी माझ्या वाटेला जाऊ नये, एवढीच त्यांना सूचना, असं नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना म्हटलंय. पटोलेंनी खासदारकीचा नुकताच राजीनामा दिलाय.

राजकारणात कुणी कुणाच्या व्यक्तिगत जीवनात जायचं नसतं. पण मुख्यमंत्र्यांची सध्याची जी सवय आहे, की जवळच्याच व्यक्तीच्या व्यक्तिगत जीवनात ते जातात. तसं माझ्या वाटेला त्यांनी जाऊ नये. एवढीच त्यांना सूचना, असं पटोले म्हणाले.

सरकार थोतांड मांडणारं आहे. हे सरकार केंद्रात आणि राज्यात पुन्हा येऊ नये याची मी काळजी घेईन, असंही ते  म्हणाले.