पापाचा घडा फोडणार, मोदींचं जात प्रमाणपत्र तपासणार!

नागपूर | खासदारकीचा राजीनामा देताच नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी खरंच ओबीसी आहेत की नाही, हे गुजरातमध्ये जाऊन तपासणार आहे, असं नाना पटोले यांनी म्हटलंय. 

राजीनामा दिल्याने आता मी पापाच्या व्यवस्थेतून मुक्त झालोय, मात्र भाजपच्या पापाचा घडा आपण फोडणार आहोत, असं त्यांनी सांगितलं.

गुजरात निवडणुकीत मणिशंकर अय्यर यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर टीका करताना मोदींनी मागास जातीचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यामुळेच आपण राजीनाम्यासाठी हा दिवस निवडल्याचं नाना पटोले यांनी सांगितलं.