Narendra Modi Mobile - “त्यावेळी गडकरी एवढंच बोलले... मोदी घरी बोलावून आपला अपमान करतात”
- औरंगाबाद, महाराष्ट्र

“त्यावेळी गडकरी एवढंच बोलले… मोदी घरी बोलावून आपला अपमान करतात”

औरंगाबाद| भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या खासदार नाना पटोले यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी काय म्हणाले? हे त्यांनी औरंगाबादच्या जाहीर सभेत सांगितले. 

मी जीएसटीविरोधात मत मांडले. त्यावेळी तुम्ही मला शिकवता का?, असा सवाल नरेंद्र मोदींनी मला केला, असं नानांनी सांगितलं. 

मोदी मला तसं म्हटल्यानंतर कोणताच नेता माझ्या जवळ आला नाही, फक्त नितीन गडकरी माझ्या जवळ आले. मोदी घरी बोलावून आपला अपमान करतात, असं ते म्हणाल्याचं नानांनी सांगितलं. 

दरम्यान, भाजपमध्ये अनेकजण दु:खी आहेत त्यामुळे लवकरच पक्षात फूट पडेल, असा गौप्यस्फोटही त्यांनी यावेळी  केला.

महत्वाच्या बातम्या-

सर्जिकल स्ट्राईकचं नेत्तृत्व करणारे जनरल म्हणतात; “ढिंढोरा पिटून काहीच फायदा होणार नाही”

-विराट कोहलीनं केला विक्रम ; दिग्गज खेळाडूंच्या यादीत समावेश

-ही तीन राज्ये वाढवणार का नरेंद्र मोदींचं टेन्शन ?

-…म्हणून गिरीश महाजनांवर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याखाली गुन्हा दाखल करा!

मराठा जात प्रमाणपत्र व पडताळणीचे आदेश लागू

या बातमीवर तुमची कमेंट लिहा