बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘हा तर घोडेबाजार’; नागपूरातील पराभवानंतर नाना पटोलेंची प्रतिक्रिया

नागपूर | नागपूर विधान परिषद निवडणुकीत भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. नागपूर विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांचा एकतर्फी विजयी झाला. पण काँग्रेला मात्र पराभव स्विकारावा लागला.

नागपूरात भाजपचा एकतर्फी विजय झाल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. घोडेबाजार करून हा विजय मिळवला आहे. घोडेबाजार होणे हे लोकशाहीसाठी घातक असल्याची टीका नाना पटोले यांनी केली आहे.

‘स्वत:चे मतदार त्यांनी बाहेर नेले. त्यांचा आपल्या मतदारावर विश्वास नव्हता. त्यामुळेच पर्यटनवारी करावी लागली’, असा खोचक टोलाही नाना पटोलेंनी लगावला आहे. ‘जो निकाल आला त्याचं स्वागत केलं पाहिजे. उमेदवार बदलल्याने आम्हाला काही फरक पडला नाही’, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे.

दरम्यान, नागपूर येथील विजयानंतर चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी नाना पटोलेंवर निशाणा साधला होता. नाना पटोले यांच्या हुकूमशाहीला जनतेने जागा दाखवली असल्याचा घणाघात चंद्रशेखर बावनकुळेंनी केला होता.

थोडक्यात बातम्या-

‘रडीचा डाव खेळू नका, आता… ‘; चंद्रकांत पाटलांचं महाविकास आघाडीला खुलं आव्हान

‘विनोदवीर नाना पटोलेंचं हास्यजत्रेपेक्षा मोठं हसं झालंय’; भाजपचा हल्लाबोल

“बावनकुळेंचा विजय म्हणजे महाविकास आघाडीला चपराक”

MLC Election Result | “नाना पटोले यांच्या हुकूमशाहीला जनतेनं जागा दाखवली”

“अंतर्गत वादामुळे काँग्रेसचा पराभव, पटोलेंनी राजीनामा द्यावा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More