नाना पटोले नेमक्या कोणत्या पक्षात जाणार?

दिल्ली | भाजपच्या खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर नाना पटोले कुठल्या पक्षात जाणार, या चर्चांना उधाण आलं आहे. मात्र नाना पटोले यांनी स्वतःच यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केलीय. 

तुर्तास कोणत्याही पक्षात जाण्याचा निर्णय घेतलेला नाही, असं नाना पटोले यांनी म्हटलंय. राजीनामा तसेच पुढील वाटचालीसंदर्भात ते थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार आहेत. 

दरम्यान, नाना पटोले यांनी आपल्याच सरकारच्या शेतकरी धोरणांविरोधात टीकेची राळ उठवली होती, तसेच नरेंद्र मोदींवर टीका करण्याचं धाडस दाखवलं होतं.