बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…तेव्हा फडणवीस रडायला लागले होते’, नाना पाटोलेंची टोलेबाजी

गोंदिया | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड करून भाजपसोबत युती करत सत्ता स्थापन केली. ते आपला गट हीच खरी शिवसेना असे म्हणत आहेत. तो कळीचा मुद्दा आहे. पण 105 आमदार असलेल्या पक्षाला एक बंडखोर, 50 आमदार घेऊन मिळतो आणि त्याच्या हाती राज्यातील सर्वोच्च पद येते म्हणजे काय? असा प्रश्न सर्वांना पडला आणि सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. पण ही वस्तूस्थिती आहे.

आता यावर काँग्रेस नेते आणि महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले (Nana Patole) यांनी भाष्य केले आहे. लोकशाही पक्षात आणि दबावतंत्रावर चालणाऱ्या पक्षांत वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात. भाजपमध्ये दबावतंत्र चालते. परवा फडणवीसांचा (Devendra Fadanvis) चेहरा आपण सर्वांनी पाहिला, कसे ते उपमुख्यमंत्री झाल्यावर रडायला लागले होते, असे नाना पाटोले म्हणाले.

नाना पाटोले सध्या विदर्भात झालेल्या अतिवृष्टीमूळे नागरींकाचे हाल झाले आहेत, ते पहाण्यासाठी विदर्भ दौऱ्यावर आहेत. काल (19 जुलै) रोजी त्यांनी भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील विविध गावांना भेट दिली. यात त्यांनी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पहाणी केली. तसेच जनतेच्या विविध समस्यांचा त्यांनी आढावा घेत त्याचे तात्काळ निरसन करण्यासाठी पाठपुरावा केला.

तसेच त्यांनी नागपूरात काँग्रेसच्या नवीन कार्यकारणीची निवड केली आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. ते गोंदिया जिल्ह्यात पत्रकारांशी बोलत होते.

थोडक्यात बातम्या – 

‘घोटाळे करायचे करायचे तुम्ही, लफडी करायची तुम्ही आणि…’,आदित्य ठाकरेंची बंडखोरांवर टीका

‘फुटीर गट चंद्रावर देखील कार्यालय स्थापन करतील एवढे ते…’, संजय राऊतांचा हल्लाबोल

तिसऱ्यांदा आई बनणार करिना कपूर?, पोस्ट करत म्हणाली…

“दिल्लीच्या दरबारात शिंदे बाद’शहां’च्या भेटीविना 12 तास तात्कळत बसले”

आमदारांच्या अपात्रतेवर आज निकाल; शिंदे सरकारचं भविष्य ठरणार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More