बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“नानांनी त्या विषयाला फार गांभिर्याने घेऊ नये”

मुंबई | काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्यावर पाळत ठेवत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे. यावरून अनेक विरोधी पक्षनेत्यांनी महाविकास आघाडीवर निशाणाही साधला आहे. अशातच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी यावर एक वक्तव्य केलं आहे.

नाना पटोले महाराष्ट्रातील महत्वाची व्यक्ती आहे आणि प्रत्येक महत्वाच्या व्यक्तीच्या सुरक्षेचा अहवाल सरकारकडे जातच असतो. त्यामुळे नानांनी ही बाब फार गांभिर्याने घेऊ नये, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना नाना पटोलेंनी गेलेल्या आरोपाबद्दल विचारण्यात आलं होतं.

तसेच, नाना पटोले यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे नाव घेऊन वक्तव्य केलं असेल असं मला वाटत नाही. मुळात राजकारणात पाळत ठेवणे या शब्दाचा अर्थ खूप वेगळा निघतो, असं त्यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे राज्यातील मोठ्या राजकीय नेत्यांच्या सुरक्षेची माहिती सरकारकडून घेतली जाते. मलाही सुरक्षा आहे. माझीही माहिती सरकारकडे असेल, असं ते म्हणाले आहेत.

मोठ्या नेत्यांना सुरक्षा दिल्यानंतर तो नेता कुठे? जातो काय करतो? गेलेल्या ठिकाणी त्याला धोका आहे का? याची माहिती नेहमी गृहमंत्री आणि मुख्यमंत्री घेत असतात. नाना पटोले हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. अशी वक्तव्ये ही होतच असतात. त्यामुळे नानांनी याकडे लक्ष न देता. त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम करावं, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

…म्हणून पुढील दोन-तीन दिवसात टाळेबंदीचा निर्णय घेतला जाईल – किशोरी पेडणेकर

वर्ल्डकप चॅम्पियन ‘यशपाल शर्मा’ यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन

‘चंद्राच्या हालचालीमुळे पृथ्वीवर येणार विनाशकारी संकट’; नासाच्या अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर

लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा धोका कमी; WHO ची माहिती

पंकजा मुंडेंची नाराज समर्थकांसोबत महत्त्वाची बैठक; मुंडे भगिनींच्या भूमिकेकडे लक्ष

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More