बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“नाना पटोलेंनी राजीनामा द्यावा आणि पुण्यातल्या ‘येरवड्या’त दाखल व्हावं”

पुणे | काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदींविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजवली आहे. देशभरातूनही यावर प्रतिक्रिया उमटत आहे. सगळ्या राजकीय नेत्यांनी पटोलेंवर निशाणा साधला असतानाच आता पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पटोलेंवर हल्लाबोल केला आहे.

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्या आणि येरवडा रुग्णालयात दाखल व्हा, अशी जहरी टीका मुरलीधर मोहोळ यांनी नाना पटोलेंवर केली आहे.

तुमची बौद्धिक कुवत आणि मानसिक स्थिती पाहता, काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्या आणि पुण्यातल्या ‘येरवड्या’त दाखल व्हा, असं मोहोळ यांनी टीव्ही9 शी बोलताना म्हटलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा ठिणगी पडल्याचं पहायला मिळत आहे.

दरम्यान, मी मोदीला शिव्याही देऊ शकतो आणि मारुही शकतो, असं वादग्रस्त वक्तव्य नाना पटोले यांनी केलं आहे. या वादग्रस्त वक्तव्यावरुन भाजप चांगलंच आक्रमक झालं आहे. नाना पटोलेंना अटक करण्याची मागणी भाजपकडून केली जात आहे.

थोडक्यात बातम्या – 

“नाना पटोलेंवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा”

‘मी मोदीला शिव्या देऊ शकतो आणि मारुही शकतो’; नाना पटोलेंच्या वक्तव्यानं खळबळ

पुढील 24 तास महत्त्वाचे, हवामान खात्याकडून अलर्ट जारी

धक्कादायक! एसटी कर्मचाऱ्याची धावत्या कार खाली उडी घेत आत्महत्या

“शरद पवारांचे आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचे काम जनतेला कळत नाही का?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More