‘केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी’; नाना पटोले आक्रमक
मुंबई | महाराष्ट्र सरकारने राज्यातील कोरोना लस पुरवठ्यातील तुटवड्यावरुन केंद्र सरकारवर टीका केली होती. याला केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी प्रत्युत्तर दिलं. महाराष्ट्र सरकारच्या बेजबाबदारपणामुळे केंद्राच्या कोरोना विरुद्धच्या लढ्याला सुरुंग लागल्याचा गंभीर आरोप हर्षवर्धन यांनी केला आहे. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
गेल्या वर्षभरापासून देशात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु आहे. या स्थितीत राज्य सरकारनं सातत्याने केंद्राकडे लस आणि आर्थिक मदत मागितली जात आहे. मात्र, काल केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्रावर आरोप केला त्याचा आम्ही निषेध करतो. त्यांनी महाराष्ट्राचा अपमान केला आहे. त्याबाबत डॉ. हर्षवर्धन यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, असं नाना पटोले म्हणाले.
कोरोना आपत्ती निवारणाची जबाबदारी ही केंद्र सरकारची आहे. तरीही केंद्र सरकार महाराष्ट्रातील जनतेच्या जीविताशी खेळत असल्याचा आरोप पटोले यांनी केलाय.
दरम्यान, कोरोनाच्या नियंत्रणात महाराष्ट्र सरकारकडून बेजबाबदारपणे काम करण्यात आलंय. हा प्रकार समजण्यापलिकडचा आहे. कोरोना लस पुरवठ्यावर सातत्याने लक्ष दिलं जातंय. राज्य सरकारांना याबाबत नियमितपणे माहिती देण्यात येत आहे. यानंतरही सरकारकडून नागरिकांमध्ये भीती पसरवणं मूर्खपणा आहे, अशी टीका हर्षवर्धन यांनी केलीये. तसेच गेले वर्षभर महाराष्ट्र सरकारने ज्या पद्धतीने गैरव्यवस्थापनाचा कारभार केला, त्यामुळे हे एकमेव राज्य कोरोना नियंत्रणातील देशाच्या लढाईत अडचणीचं ठरलं आहे. आम्ही राज्य सरकारला सातत्याने मदत केली. त्यांना सर्व संसाधने उपलब्ध करून दिली, अशा शब्दांत हर्षवर्धन यांनी ठाकरे सरकारला सुनावलं आहे.
थोडक्यात बातम्या-
प्रकाश जावडेकरांचा पत्रकार परिषदेत ठाकरे सरकारवर निशाणा, म्हणाले…
माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका!
मोठी बातमी! मुंबई लोकलवर पुन्हा एकदा निर्बंधांची टांगती तलवार
‘पुण्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर’; सुप्रिया सुळेंनी केंद्र सरकारकडे केली ‘ही’ मागणी
भाषण चालू असताना अजित पवारांना चिठ्ठी आली, ‘दादा मास्क काढा’; अजित पवार म्हणाले…
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.