महाराष्ट्र मुंबई

“जनतेने मोदी सरकारला देश विकायला सत्तेवर आणलं नव्हतं”

Photo Credit- Facebook/ Narendra Modi, Nana Patole

मुंबई | अर्थसंकल्पात देशातील संपत्ती विकून 1 लाख 95 हजार कोटी रुपये उभारणार असल्याचं मोदी सरकारने सांगितलं. यासाठी त्यांनी मुंबईची आणि देशाची शान असलेलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशनही विकायला काढलं. मोदी सरकारला जनतेने देश विकायला सत्तेवर आणलं नव्हतं, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकारवर केली आहे.

नाना पटोले यांनी ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानात आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारताना मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. तसेच नाना पटोले यांनी यावेळी बोलताना मोदी सरकार चले जाओचा नारा दिला.

जीएसटी, नोटबंदी आणि कोणतीही पूर्वकल्पना नसताना लावण्यात आलेलं लॉकडाऊन यामुळे सर्वसामान्यांचे प्रचंड हाल झाले. शिवाय कोरोना काळात मजूर आणि इतर लोकांचेही हाल होत असताना केंद्रातील मोदी सरकारने मौन बाळगलं, असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

काँग्रेस सत्तेत असताना देशात एलआयसी, विमानतळ आणि इतर अनेक गोष्टी उभ्या केल्या. दुसरीकडे भाजपने 2 कोटी लोकांना रोजगार देऊ, 15 लाख खात्यात टाकू असं सांगितलं. मात्र, प्रत्यक्षात त्या फसव्या घोषणा होत्या, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या-

इक्बाल मिर्ची प्रकरणात या नेत्याला ईडीकडून समन्स!

‘माझी बहिण वाघिण होती पण…’; पूजा चव्हाणच्या बहिणीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल!

प्रमुख पक्षाचं तिकीट घेऊनही पठ्ठ्याचं डिपॉझिट जप्त होतंय, अन् तुम्ही मला…- अजित पवार

‘दरवाजा तोड, मोबाईल ताब्यात घे’; पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील ऑडिओ क्लिप व्हायर

मुख्यमंत्री महोदय, सर्व पुरावे असतांना वाट कसली पाहताय- चित्रा वाघ

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या