बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“नरेेंद्र मोदीजी अजून किती फेकणार, आता हद्द झाली राव”

मुंबई | बांगलादेशला स्वातंत्र्य मिळावं म्हणून मी सुद्धा लढ्यात उतरलेलो, मला अटकही झाली होती, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. नरेंद्र मोदी सध्या बांगलादेशच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असून ढाका येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मोदींच्या या वक्तव्यावरून विरोधकांनी मोदींवर निशाणा साधला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली आहे. नरेंद्र मोदीजी अजून किती फेकणार, असं नाना पटोलेंनी म्हटलं आहे. नाना पटोले यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.

अजून किती फेकणार मोदीजी, हद्द केली राव. शेतकरी आंदोलनावर एक शब्दही तुमच्या तोंडून निघाला नाही आणि स्वातंत्र्याबद्दल बोलण्यासाठी बांगलादेशला जाता. तुम्ही शेतकऱ्यांना आंदोलनजीवी म्हणाला होतात. आता तुम्ही कोण झालात ढोंगीजीवी, अशी बोचरी टीका नाना पटोले यांनी नरेंद्र मोदींवर केली आहे.

दरम्यान, बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेणे, हे माझ्या आयुष्यातील पहिल्या आंदोलनांपैकी एक होतं. माझे वय 20-22 वर्ष असेल जेव्हा मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी बांगलादेशच्या लोकांच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह केला होता, असं नरेंद्र मोदींनी सांगितलं आहे.

 

 

थोडक्यात बातम्या- 

मनसुख हिरेनच्या पोस्टमार्टमपूर्वी सचिन वाझेंनी घेतली होती डाॅक्टरांची भेट; NIA च्या हाती लागली ‘ही’ माहिती

आलिया भट्टच्या आईचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सवाल, म्हणाल्या…

देवेंद्र फडणवीस यांच्यावर टांगती तलवार; फोन टॅपिंग प्रकरणात चौकशीची शक्यता

‘नियम फक्त सर्वसामान्यांसाठीच आहेत का?’; मनसे आमदार राजू पाटील यांचा संतप्त सवाल

छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन सत्तेत आले, तरी…- चंद्रकांत पाटील

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More