बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पंतप्रधान नरेंद्र मोदींना मृत्यूचा उत्सव साजरा करण्याची हौस”

मुंबई | काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सूचना ऐकल्या असत्या तर आज लाखो जीव वाचले असते. मात्र मोदींना मोदींना मृत्यूचा उत्सव साजरा करण्याची हौस आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली आहे.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी मोदी सरकारला सातत्याने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत सकारात्मक सूचना केल्या. पण सत्तेच्या अहंकाराने आपल्याच मस्तीत दंग असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या नेत्यांनी राहुल गांधी यांना गांभीर्याने घेत नाही असे म्हणत त्यांची खिल्ली उडवण्याचा पोरकटपणा केला, असं म्हणत नाना पटोलेंनी देशातील कोरोनाच्या परिस्थितीवरून केंद्र सरकार आणि भाजपला सुनावलं आहे.

लोक वैद्यकीय उपचाराअभावी प्राण सोडत असताना ‘मृत्यूचा उत्सव’ साजरा करण्याची मोदींची हौस अजून संपलेली दिसत नाही. गरीब, असहाय्य जनतेच्या मृतदेहावर उभे राहून निवडणुकीचा प्रचार करणारा पंतप्रधान म्हणून देशाच्या इतिहासात नरेंद्र मोदींची नोंद होईल, अशी बोचरी टीका नाना पटोलेंनी मोदींवर केली आहे.

मोदी सरकारने राहुल गांधींनी केलेल्या सुचनांना गांभीर्याने घेतलं असतं तर आज देशात हजारो चिता जळतानाचे विदारक चित्र पाहण्याची वेळ आपल्यावर आली नसती. आतातरी मोदी सरकारने झोपेतून जागे व्हावे आणि 130 कोटी जनतेच्या जिवीताकडे गांभीर्याने लक्ष द्यावं, असं आवाहन पटोले यांनी केलं आहे.

 

 

 

थोडक्यात बातम्या- 

कोरोना ही बिल गेट्सची कल्पना, तो व्हायरस नसून दहशत- बंडातात्या कराडकर

मराठी चित्रपट चालत नाहीत याला मराठी प्रेक्षकच जबाबदार; प्रसाद ओक संतापला

कोरोना झाला, दिवसभर फिरुनही बेड मिळाला नाही; पुण्यातील महिलेची आत्महत्या

करण जोहरनं कार्तिक आर्यनला सिनेमातून काढलं, यापुढेही काम देणार नाही?

पत्नीचं दुसऱ्याशी अफेअर, पती ढसाढसा रडला अन् उचललं धक्कादायक पाऊल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More