Top News

“काँग्रेसनं संविधान सांभाळलं म्हणून चहावाला देशाचा पंतप्रधान झाला”

Photo Courtesy- Facebook/Narendra Modi

भंडारा | बाबासाहेबांनी दिलेलं संविधान काँग्रेसनं सांभाळलं म्हणून चहावाला देशाचा पंतप्रधान झाला, असं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. ते भंडाऱ्यात माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे.

कोरोनासाठी ताटं वाजवायला लावले. त्याने कोरोना गेला का? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ताटं वाजवायला लावून देशात अवदसा आणली, अशी बोचरी टीका नाना पटोले यांनी नरेंद्र मोदींवर केली आहे.

लॅाकडाऊनमध्ये आलेलं काही बिल माफ करावं, ही काँग्रेसची भूमिका आहे. आमचं सरकार असलं म्हणून आम्ही गप्प बसणार नाही, असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

शेतकऱ्यांना दिल्लीत येण्याला मनाई केली जात असेल, तर मग ही कसली लोकशाही आहे. 26 जानेवारीच्या घटनेचा निषेध करायला हवा. लाल किल्ल्यावर झेंडा फडकवणारा भाजप आणि संघाचा माणूस होता. 26 जानेवारीला शेतकऱ्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला. 2 लोकांसाठी शेतकऱ्यांच्या विरोधात कायदे करण्यात आले, असंही नाना पटोले यांनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या-

हे आघाडीचं सरकार, काँग्रेसचं सरकार आल्यावर वीजेचं बिल माफ करणार- नाना पटोले

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण!

शिवजयंतीनिमित्त रायगडावर केलेल्या प्रकाशव्यवस्थेवरुन खासदार संभाजीराजे भडकले, म्हणतात…

शिवजयंतीवर निर्बंध मग राष्ट्रवादीचा वशाटोत्सव अन् संमेलनावरही बंदी घाला- संभाजी ब्रिगेड

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात वशाटोत्सव, शरद पवार उपस्थित राहणार!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या