“नरेंद्र मोदींनी नटसम्राट व्हावं, लोकतंत्रात असा ड्रामा चालत नाही”
नागपूर | राज्यसभेत काँग्रेस नेते गुलाब नबी आझाद यांच्याविषयी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाल्याचं पहायला मिळालं. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
नरेंद्र मोदी यांनी नटसम्राट व्हावं, चित्रपटात काम करावं. लोकतंत्रात असा ड्रामा चालत नाही, अशी बोचरी टीका नाना पटोले यांनी नरेंद्र मोदींवर केली. नाना पटोले प्रदेशाध्यक्षपदी नेमणूक झाल्यानंतर पहिल्यांदा नागपूरमध्ये आले. यावेळी बोलताना नाना पटोले यांनी नरेंद्र मोदींवर जोरदार टीकास्त्र सोडलं.
दिल्लीत गेल्या 77 दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. त्या आंदोलनातील शेतकरी नेते राकेश टिकैत यांचे अश्रू भाजपला दिसत नाहीत का?, असा सवालही नाना पटोले यांनी नरेंद्र मोदींना केला आहे.
आपल्याला हायकमांडनं ऊर्जा देण्याचं काम केलं. ही ऊर्जा पुढे नेण्याचं काम आता करणार असल्याचं नाना पटोले यांनी यावेळी बोलताना सांगितलं.
थोडक्यात बातम्या-
अवैधरित्या दारु विकण्यासाठी घेतला देवाचा आधार; घडलेला प्रकार पाहून पोलिसही हैराण
धक्कादायक! हॅार्न वाजवल्याचा राग आल्याने चालकाच्या डोक्यात फोडली बिअरची बाटली
कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष पवार कधी कुस्ती खेळलेत का?; सदाभाऊ खोतांना राष्ट्रवादीचं प्रत्युत्तर
मोहम्मद सिराजने धरला कुलदीपचा गळा, व्हायरल व्हिडीओमुळे खळबळ; पाहा व्हिडीओ
शिवजयंतीनिमित्त सयाजी शिंदेंचा नवा संकल्प, तुम्हालाही वाटेल अभिमान!
Comments are closed.