बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मराठा समाजाला आरक्षण मिळू नये ही केंद्राची इच्छा आहे का?”

मुंबई | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर आता राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजपमध्ये जोरदार राजकारण सुरु झालंय. आता सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

केंद्र सरकारने केलेली 102 वी घटना दुरुस्ती ही मराठा आरक्षणाच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा ठरली आहे. गायकवाड समितीने त्यांचा अहवाल राज्य सरकारला दिला होता. त्या आधारे राज्याने मराठा आरक्षण कायदा संमत केला होता. केंद्र सरकारने या घटनादुरुस्तीनंतर राज्यांना आरक्षण देण्याचा अधिकार आहे की नाही याबाबत जाणिवपूर्णक यामध्ये संदिग्धता ठेवली, असं नाना पटोले म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयामध्ये अॅटर्नी जनरलने वेगवेगळ्या भूमिका घेतल्या. तसेच केंद्र सरकारच्या या कायद्याचा न्यायालयाला अर्थ समजावून देण्यात ते सपशेल अपयशी ठरले आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय म्हणत असेल की 102 व्या घटना दुरुस्तीमुळे राज्यांचे आरक्षणाबाबतचे अधिकार संपुष्टात आले तर मराठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारी आता केंद्र सरकारचीच आहे. त्यामुळे केंद्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं अन्यथा या निर्णयाचे दूरगामी दुष्परिणाम होणार आहेत, असं नाना पटोलेंनी सांगितलं.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही काँग्रेस पक्षाची सुरुवातीपासूनची भूमिका आहे. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा पूर्ण अभ्यास करून उचित पावले टाकावीत, असंही नाना पटोले म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

अखेरच्या श्वासापर्यंत दिली साथ; पतीच्या मृतदेहाला मिठी मारून पत्नीने सोडला जीव

“मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या काही याचिका NCP स्पॉन्सर्ड”

“मला, पत्नीला आणि मुलीला कोणी जीवे मारलं तर त्याला शरद पवार जबाबदार असतील”

मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी रामदास आठवलेंनी सांगितला ‘हा’ उपाय

देशावर कोरोनाचं संकट; आरबीआयने केली ‘ही’ मोठी घोषणा

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More