बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चित्रा वाघ यांनी टाकलेल्या हॉटेलमधील ‘त्या’ व्हिडीओवरून नाना पटोले भडकले, दिला ‘हा’ गंभीर इशारा

मुंबई | काँग्रेस प्रदेशाध्याक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या एका व्हायरल व्हिडीओमुळे (Viral Video) सध्या खळबळ उडाली आहे. या व्हायरल व्हिडीओत टी-शर्ट घातलेली एक व्यक्ती हॉटेलमध्ये महिलेसोबत खुर्चीवर बसली आहे. व्हिडीओतील व्यक्ती प्रमाणे टी-शर्ट घातलेले नाना पटोलेंचे फोटोही या व्हिडीओत जोडण्यात आले आहेत. तर व्हिडीओत महिलेसोबत दिसणारी ती व्यक्ती नाना पटोले असल्याचा दावा केला जात आहे.

भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी देखील हा व्हिडीओ ट्विट केला आहे. इतकंच नाही तर चित्रा वाघ यांनी काय नाना… तुम्ही पण काय झाडी, डोंगार, हाटीलीत, असा टोला लगावत नाना पटोलेंना टॅग देखील केलं आहे. यावरून आता नाना पटोले चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

व्यक्तिगत बदनामी करण्याचं हे भाजपचं (BJP) षडयंत्र असल्याचा आरोप नाना पटोलेंनी केला आहे. तसेच या व्हिडीओ विरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचा गंभीर इशारा देखील नाना पटोलेंनी दिला आहे. तर हा व्हिडीओ आधीच व्हायरल झाला असून आपण फक्त ट्विट केल्याचा दावा वाघ यांनी केला आहे.

दरम्यान, राजकीय घडामोडींमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यामुळे नाना पटोलेंच्या या व्हिडीओवरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जाण्याची शक्यता आहे.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

राष्ट्रपती निवडणुकीचा आज निकाल, द्रौपदी मुर्मू 15 वर्षांपूर्वीप्रमाणे इतिहास रचणार?

शरद पवारांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीचे विभाग आणि सेल बरखास्त

‘या’ नऊ राज्यात कोरोनाचा फैलाव वाढतोय, केंद्रीय आरोग्य मंत्रालय अलर्ट मोडवर

“देवेंद्र फडणवीस जे बोलले ते त्यांनी सत्तेत येताच केवळ 20 दिवसात करून दाखवलं”

“ओबीसी आरक्षण तुम्ही मिळवून दिलं म्हणताय तर मग आता धनगर आरक्षणही द्या”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More