बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…पण ज्यांना मुल बाळ नाही त्यांना काय कळणार”

नागपूर | रशिया-युक्रेन युद्धाने भयावह रूप घेतलं असताना हजारो भारतीय विद्यार्थी अजूनही युक्रेनमध्ये अडकले आहेत. विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकारने ऑपरेशन गंगा सुरू केलं. मात्र, रशियाने केलेल्या मिसाईल हल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. यावरून संपूर्ण देशात संताप व्यक्त केला जात आहे.

भारतीय विद्यार्थ्याचा युक्रेनमध्ये मृत्यू झाला यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. नाना पटोलेंनी केंद्राच्या धोरणावर सडकून टीका केली आहे. केंद्रातील सरकार आपल्या देशातील लोक युक्रेनमधून आणण्यात कमी पडलं आहे. हे सत्य आहे आणि त्यांनी मान्य केलं पाहिजे, अशी टीका नाना पटोलेंनी केली आहे.

केंद्र सरकार म्हणतं तुम्ही काही गडबड करू नका. आम्ही सगळं बघून घेऊ. मात्र, आज ज्यांचे मुलं त्याठिकाणी शिकत आहेत त्या कुटुंबीयांना काय वेदना होत असतील. पण ज्यांना मुल बाळ नाही त्यांना ते काय कळणार, असा घणाघात नाना पटोले यांनी केला आहे.

दरम्यान, युक्रेनमध्ये असलेले विद्यार्थी ह्रदय पिळवटून टाकणाऱ्या घटना सांगत आहेत. हे सगळं बघून जर देशाचे पंतप्रधान जागे झाले असतील तर सगळे मुलं देशात आणले पाहिजे अशी सदबुद्धी त्यांना मिळो अशीच मी आशा करतो, असा टोला देखील नाना पटोले यांनी लगावला आहे.

थोडक्यात बातम्या-

“अमर, अकबर, अँथनीचं सरकार आहे, पायात पाय अडकून पडेल”

उदयनराजेंचा हटके अंदाज! हाती घेतलं रिक्षाचं स्टेअरिंग; पाहा व्हिडीओ

महाशिवरात्रीला भांगचा हँगओव्हर झालाय? मग करा ‘हे’ 6 घरगुती उपाय

“प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट करायचा आणि मते मिळवायची, असं हे भाजपचं राजकारण”

“हिमालयाची उंची असलेल्या पंतप्रधानांवर टीका करायला तुमची तेवढी लायकी असली पाहजे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More