बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“माझ्या पक्षाचं काम करताना कोणाला राग येत असेल तर मला फरक पडत नाही”

मुंबई | दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लोणावळ्यातील आयोजित कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यावर गंभीर आरोप केले होते. या सर्व प्रकरणामुळे महाविकास आघाडी सरकारमधील कुरबुरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचं चित्र पाहायला मिळालं.

काल महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच. के पाटील यांनी काँग्रेस नेत्यांची बैठक घेतली. तसेच काँग्रेस प्रभारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. दरम्यान, या भेटीबद्दल मला कोणत्याही प्रकारची माहिती नव्हती असं नाना पटोले यांनी बोलून दाखवलं आहे. तसेच नाना पटोले यांच्या वक्तव्यामुळे नाराज असल्याचं शरद पवार यांनी काँग्रेस प्रभारींकडे बोलून दाखवलं.

आरक्षणासंदर्भात आम्ही भाजप विरोधी आंदोलन उभा करणार असून त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आमचे प्रभारी शरद पवार यांच्या भेटीला गेले होते. असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. तसेच या भेटीबद्दल मला माहिती नव्हतं आणि निमंत्रण सुध्दा नव्हतं, असं देखील त्यांनी सांगितलं. ‘मला माझ्या पक्षाचं काम करायचं आहे आणि ते करत असताना कोणाला राग आला तर मला फरक पडत नाही’, असं नाना पटोले यांनी स्पष्टपणे बोलून दाखवलं आहे.

पक्ष मजबूत करण्याची जबाबदारी हायकमांडने दिली असताना ती चोखपणे पार पाडण्याकडेच लक्ष असून काँग्रेस पक्ष हा संपला आहे असं अजिबातच नाही, कारण संजीवनी ही नेत्यांकडे नसून जनतेकडे आहे, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

 

थोडक्यात बातम्या – 

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More