बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पंतप्रधान नरेंद्र मोदीही संसदेत नसतात, त्यामुळे त्यांचा चार्जही दुसऱ्याकडे द्या”

मुंबई | देशाच्या केंद्रस्थानी पंतप्रधान तर राज्याच्या केंद्रस्थानी मुख्यमंत्री ही दोन पदं महत्त्वाची आहेत. देशाचे पंतप्रधान सध्या विकास कामांचा आढावा घेण्यात व्यस्त असल्यानं संसदेत अधिवेशनाला उपस्थित नाहीत तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तब्येत बरी नसल्यानं अधिवेशनाला उपस्थित नाहीत. परिणामी केंद्रात अन् राज्यात दोन्ही नेत्यांच्या अनुपस्थितीवरून जोरदार राजकारण रंगलं आहे.

उद्धव ठाकरे यांच्या जागी मुख्यमंत्रीपदाचा कारभार कोणाकडं तरी द्यावा अशी मागणी विरोधी पक्ष भाजपन केली आहे. याबाबत विरोधी पक्षांनी अनेक नेत्यांची नावं घेतली आहेत. यावर काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपचा चांगलाच समाचार घेतला आहे. भाजपकडून उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना चार्ज दिला जाणार का असा प्रश्न उपस्थित केला होता.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अधिवेशनातील उपस्थितीवरून प्रश्न विचारत त्यांचा चार्ज दुसऱ्यांकडे द्यावा अशी विचारणा करणाऱ्या भाजपने आधी संसदेची माहिती घ्यावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी अपवाद वगळता अधिवेशनात कधीच उपस्थित नसतात त्यांचा चार्जही दुसऱ्या मंत्र्याकडे द्या, अशी मागणी नाना पटोले यांनी भाजपकडं केली आहे.

दरम्यान, भाजपकडून मुख्यमंत्री पदाचा उगाच वाद निर्माण केला जात आहे. मुख्यमंत्री सातत्यानं काम करत आहेत, असं सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री अधिवेशनाला उपस्थित राहतील असं सांगितलं आहे.

थो़डक्यात बातम्या 

“भास्कर जाधवांनी सभागृहात नौटंकी करण्यापेक्षा…”

‘ही महाराष्ट्राची परंपरा नाही’; सभागृहातच अजित पवारांनी भास्कर जाधवांना सुनावलं

मोदींची नक्कल, भाजपचा राडा अन् भास्कर जाधवांनी मागितली बिनशर्त माफी

“भाजप अमृता फडणवीसांना विरोधी पक्षनेत्या करणार का?”

“रश्मी ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा चार्ज द्यायला काही हरकत नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More