नाना पटोलेंचा राष्ट्रवादी, शिवसेनेला इशारा, म्हणाले…
मुंबई | अनेक दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमध्ये बिघाडी असल्याचे आरोप विरोधक करत आहेत. वेगवेळ्या विचारसरणीच्या पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केलेलं सरकार जास्त काळ टिकू शकत नाही, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला होता. आता हा दावा खरा ठरत असल्याचं चित्र आहे. काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी याबाबत संकेत दिले आहेत.
गेले अनेक दिवस काँग्रेस आमदारांना निधी कमी मिळत असल्याच्या तक्रारी आमदार करत होते. यावरून एखादी गोष्ट कमी मिळत असेल तर ती बोलून दाखवणं यात काही चूक नाही. महाविकास आघाडी सरकार हे किमान-समान कार्यक्रमावर उभे राहिलेलं सरकार आहे, त्यामुळे प्रत्येक गोष्टींची समान वाटणी व्हावी अशी आमची अपेक्षा आहे. काँग्रेस आहे म्हणून सरकार आहे, हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने लक्षात घ्यावं, असं म्हणत नाना पटोलेंनी सरकारला खडेबोल सुनावले आहेत.
निधी कमी मिळत असल्याचा मुद्दा काँग्रेस आमदारांनी याआधीही उपस्थित केला होता. त्यावरून काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. मात्र आता पुन्हा काँग्रेस आमदारांना निधी कमी मिळत आहे, अशी खंत नाना पटोले यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षाकडून विधानसभा अध्यक्ष पद मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जात होते. मात्र विधानसभा अध्यक्षपद हे काँग्रेसकडेच राहिल, असा विश्वास नाना पटोलेंनी व्यक्त केला होता.
थोडक्यात बातम्या-
1 मार्चपासून शाळा बंद की चालू??? शिक्षणमंत्र्यांनी केली मोठी घोषणा
दलालांमुळे आपल्या शेतकर्याची घुसमट होऊ नये अशी माझी इच्छा- नरेंद्र मोदी
तो आला, जामीन मिळवला आणि पोलिसांच्या हातावर तुरी देत पुन्हा फरार झाला!
नराधमाने तब्बल 66 जणींवर केला बलात्कार, अशा पद्धतीने महिलांना ओढायचा आपल्या जाळ्यात!
पुणेकरांनो काळजी घ्या!; कोरोना रुग्णवाढीची आजची आकडेवारी देखील अत्यंत धक्कादायक
Comments are closed.