बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मित्र मित्राला मिठी मारणार नाही तर कुणाला मिठी मारणार?”

मुंबई | काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. काँग्रेस नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगण्यास सुरुवात झाली. यावर आता नाना पटोलेंनी भाष्य केलं आहे.

देवेंद्र फडणवीस आणि मी आम्ही दोघं मित्र आहोत. हे जगजाहीर आहे. तेही सर्वांना सांगतात, मीही सांगत असतो. मित्राला मित्र मिठी मारत नाही तर काय दुश्मनाला मारतात? असा सवाल पटोले यांनी केला. या मिठीचा राजकीय अर्थ काही होऊ शकत नाही, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्राची परंपरा आहे. त्यानुसार काम व्हावं, त्यानुसार त्यांच्याकडे ही मागणी केली आहे, असं ते म्हणाले. काल फडणवीसांची भेट घेतली. त्यावेळी 12 सदस्यांचं निलंबन रद्द करण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही, असंही नाना पटोले म्हणालेत.

दरम्यान, भाजप काँग्रेस दोन तट आहेत. कधीही एकत्र येऊ शकत नाही. दोन्ही पक्षांची राजकीय विचारसरणी वेगळी आहे. त्यामुळे ते एकत्रं येऊ शकत नाही. फक्त देशहितासाठीच एकत्रं येऊ शकतात, असं नाना पटोले म्हणालेत. तसेच आम्ही काल राज्यसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने फडणवीसांना भेटलो. आमच्या राज्यसभेच्या उमेदवार रजनी पाटील यांची निवड बिनविरोध व्हावी यासाठी आम्ही गेलो होतो. त्यासाठी कोणत्याही वाटाघाटी झाल्या नाहीत. वाटाघाटी हा आमचा भाग नाही, असंही पटोले म्हणालेत.

थोडक्यात बातम्या- 

“एक दिवस सगळे संघ पाकिस्तानात खेळायला येतील”

‘माझ्याकडे 500 पुरावे’; छगन भुजबळांविरोधात शिवसेना आमदाराची धाव

“सोनियांचा पट्टा गळ्यात बांधलेल्या कागदी वाघाला…”; अतुल भातखळकरांची बोचरी टीका

पाकिस्तानच्या अडचणी वाढल्या! मोदींच्या भेटीनंतर कमला हॅरिस यांनी दिला पाकिस्तानला इशारा

‘या’ लोकांना कोरोना लस घरीच मिळणार, केंद्राने घेतला मोठा निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More