बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काँग्रेस कार्यकर्त्यांनी पूरग्रस्तांना शक्य ती मदत करावी- नाना पटोले

मुंबई | राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे कुठं दरड कोसळली, तर कुठं पूराचं पाणी थेट घरांमध्ये घुसलं. त्यामुळे अनेक लोक बेघर झालेत. सर्वसामान्यांचे हाल करणाऱ्या अनेक घटना महाराष्ट्रात घडल्यात. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार बाधित काँग्रेस कार्यकर्त्यांनीही लोकांना आपल्या परीने शक्य ती सर्व मदत करावी, असं आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे.

काँग्रेसचे स्थानिक आमदार व मंत्रीही पूरग्रस्त भागाची पाहणी करून प्रशासनाच्या माध्यमातून मदत पोहचवत आहे. मी स्वतः सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली आहे. लोकांना मदतीची गरज आहे. या संकटात त्यांना यथाशक्ती मदत करावी, असं नाना पटोले म्हणाले.

राज्यावर आलेली ही नैसर्गिक आपत्ती मोठी आहे. अतिवृष्टीने शेती, शेतमाल, जीवनावश्यक वस्तू, घरांचे मोठे नुकसान झाले आहे. या आपत्तीग्रस्त भागात मदत व बचाव कार्याची सध्या मोठी गरज आहे. अन्नधान्य, औषधं, कपडे, राहण्याची व्यवस्था करावी लागणार आहे, असं नाना पटोले म्हणालेत.

कोरोना संकटातही काँग्रेस कार्यकर्ते मदतीसाठी धावून गेले होते. संकट काळात जनतेच्या मदतीला धावून जाणे काँग्रेसची परंपरा आहे, असं नाना पटोलेंनी म्हटलं आहे, असं त्यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

नवविवाहित जोडप्यावर काळाचा घाला, अपघातात वधूवरासह सहा जणांचा मृत्यू

कोकण, पश्चिम महाराष्ट्रामधील मृत्युतांडव, अश्रूतांडव शब्दापलीकडचं- तुकाराम मुंढे

राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय घट; सक्रिय रुग्णांसह नवी रुग्ण संख्या आटोक्यात

काय सांगता! अवघ्या 23व्या वर्षी ‘ही’ महिला आहे 11 मुलांची आई, 105 मुलांची अपेक्षा

शाब्बास पुणेकरांनो! कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्याने अखेर करुन दाखवलं, वाचा आजची आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More