भंडारा | शेती पंपाचं अर्धे बिल माफ केलं जाईल. या अर्ध्या बिलातून वीजेसाठी पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील. हे आघाडीचं सरकार असून काँग्रेसचं सरकार आल्यावर वीजेचं बिल माफ करु, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
लॅाकडाऊनमध्ये आलेलं काही बिल माफ करावं, ही काँग्रेसची भूमिका आहे. आमचं सरकार असलं म्हणून आम्ही गप्प बसणार नाही, असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे. ते भंडाऱ्यात माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे.
शेती पंपाचे बिलं दुरुस्त केले जातील. वीज बिलाच्या या अर्ध्या पैशात वीजेच्या पायाभूत सुविधा उभ्या केल्या जातील, असंही नाना पटोले यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, विरोधकांकडून राज्य सरकारबद्दल विष पसरवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. त्यावर उत्तर देणं हे माझं काम आहे. भंडारा, गोंदियातील धान खान्यायोग्य नाही, असा फतवा केंद्र सरकारने काढला. त्यामुळे राईसमिलवाल्यांचा वाद निर्माण झाला. राज्य सरकारने राईसमिलवाल्यांना धान उचलण्याच्या सूचना दिल्यात. जे नुकसान होईल ते राज्य सरकार स्वीकारेल. रावसाहेब दानवे यांनी धान खरेदी टाळत ठेवली म्हणून धान खरेदीचा प्रश्न लांबला, असंही नाना पटोले म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण!
शिवजयंतीनिमित्त रायगडावर केलेल्या प्रकाशव्यवस्थेवरुन खासदार संभाजीराजे भडकले, म्हणतात…
शिवजयंतीवर निर्बंध मग राष्ट्रवादीचा वशाटोत्सव अन् संमेलनावरही बंदी घाला- संभाजी ब्रिगेड
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात वशाटोत्सव, शरद पवार उपस्थित राहणार!
गजावरची कारवाई फक्त ट्रेलर, वेळीच सुधरा नाहीतर… ‘या’ अधिकाऱ्याचा इशारा