नवी दिल्ली | गुजरात दंग्यांवर आधारीत डॉक्युमेंट्रीवरून बीबीसी (BBC)विरोधात सुरु झालेला वाद पेटला असतानाच आणखी एक मोठी बातमी हाती आली आहे.
दिल्ली येथील बीबीसीच्या (BBC) मुख्यालयावर प्राप्तिकर विभागाच्या वतीने धाड टाकण्यात आली आहे. आयकर विभागाचे अधिकारी या कार्यालयाची झाडा झडती घेत आहेत. यावरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
बीबीसी कार्यालयांवरील छापेमारीनंतर काँग्रेसने केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. आधी बीबीसीची डॉक्युमेंटरी आली. त्यावर बंदी घातली. आता छापेमारी झाली. ही अघोषित आणीबाणी असल्याची गंभीर टीका काँग्रेसने केली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यांनीही केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. पटोलेंनी थेट मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे.
दरम्यान, BBC ने मोदींवर एक डॉक्युमेंट्री बनवली आणि लगेच BBC च्या कार्यालयावर IT च्या धाडी पडू लागल्या. 56 इंचाची छाती किती भित्री आहे, हे आज पुन्हा एकदा स्पष्ट झालं, असं म्हणत पटोलेंनी मोदींवर टीका केलीये.
महत्त्वाच्या बातम्या-