नाना पटोलेंच्या वक्तव्याने महाविकास आघाडीचं टेंशन वाढलं, म्हणाले ‘येणाऱ्या काळात…’
नागपूर | मागील अडीच वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न केला. हे काम सातत्याने सुरू आहे. याची तक्रार मी चिंतन शिबिरात हायकमांडकडे केली आहे, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
अडीच वर्षातील राष्ट्रवादीच्या कुरघोडीचे अनेक उदाहरणं आम्ही आमच्या हायकमांड समोर मांडली. त्यांनी हे सर्व ऐकून घेतलं या संदर्भात आता पुढची रणनीती ठरवली जाईल, असंही नाना पटोले म्हणालेत. ते नागपूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.
नाना पटोलेंनी यावेळी बोलताना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवरही भाष्य केलं. त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ऐकला चलो रे वर काँग्रेस ठाम असल्याचं सांगितलं आहे.
दरम्यान, उदयपूरच्या शिबीरात देश हिताचं चिंतन झालं असं म्हणत 2 ॲाक्टोबरपासून काँग्रेस देशभरात पदयात्रा काढणार असल्याची माहिती नाना पटोले यांनी यावेळी दिली.
थोडक्यात बातम्या-
मोठी बातमी! पोलीस अधिकाऱ्याच्या आणखी एका लेटर बॉम्बने खळबळ
खळबळजनक! प्रसिद्ध अभिनेत्रीचा राहत्या घरात सापडला मृतदेह
‘वज़नदारने हल्के को…’; अमृता फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका
राज्यातील ‘या’ 9 जिल्ह्यांना पाऊस झोडपून काढणार, वाचा हवामान खात्याचा अंदाज
मोठी बातमी! SBI चा ग्राहकांना मोठा झटका, आता…
Comments are closed.