“भाजपची उलटी गिनती सुरू झालीये”

पुणे | कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी प्रतिस्पर्धी हेमंत रासने यांना पराभवाची धूळ चारली आहे. निकाला नंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजप वर खोचक टीका केली आहे. भाजपची उलटी गिनती सुरू झालीये, असं ते म्हणालेत.

सत्ता, पैसा आणि दडपशाही यांचा वापर करुनही भाजपला विजय मिळवता आला नाही कारण जनतेला भाजपचं खरं रुप कळलं आहे. शिक्षक-पदवीधर मतदारसंघाची निवडणूक असो किंवा मग आताची ही पोटनिवडणूक भाजपला उतरती कळा लागली आहे हे नक्की, असं ट्विट काँग्रेसने केलंय.

रवींद्र धंगेकर यांचा पराभव करण्यासाठी भाजपने मनसे, शिंदे गट आणि सर्वच मंत्र्यांना मैदानात उतरवले होते. पण, पुणेकरांनी धंगेकरांना साथ दिली.

पुण्यात कसबाची पोटनिवडणूक अत्यंत चुरशीची ठरली. भाजपने टिळक वाड्याला नाकारून नवीन उमेदवार मैदानात उतरला. त्यामुळे सुरवातीपासून भाजपमध्ये नाराजीचे सूर उमटले होते. अखेर ही नाराजी भाजपला महागात पडली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More