बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…तर यशोमती ठाकूर मुख्यमंत्र्यांच्या अंगावर जायला मागे पुढे पाहणार नाहीत”

अमरावती | मतदार संघाच्या हक्कासाठी, तुमच्या मागण्यांसाठी मंत्री यशोमती ठाकूर या रणरागिणी झाल्याचं आपण पाहिलं आहे. वेळ आली तर त्या तुमच्यासाठी CM च्या अंगावर जायला मागे पुढे पाहणार नाहीत, असं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे.

नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वादंग निर्माण होण्याची चिन्हे आहेत. नाना पटोले यांचा हा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. आघाडीमध्ये असलेल्या काँग्रेसची नाराजी अनेकवेळा समोर आली आहे. आता पटोलेंच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अकोला येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री होण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’मधून गौरविलेले अकोल्याचे मुरलीधर राऊत यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुरलीधर राऊत यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करताना नाना पटोले यांनी मुख्यमंत्री व्हावं,अशी इच्छा व्यक्त केली होती.

नाना पटोले यांच्या वक्तव्यावरुन राजकीय पडसाद उमटण्या सुरुवात झाली आहे. काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांचं वक्तव्य त्यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे. हे स्पष्ट दर्शवतं की त्यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यशैलीवर विश्वास नाही, असं भाजप आमदार राम कदम म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या- 

दिग्गज धावपटू मिल्खा सिंह यांच्या पत्नीचं कोरोनामुळे निधन

पुणेकरांना दिलासा; आजपासून आणखी नियम शिथिल होणार, वाचा नव्या गाईडलाईन्स

जगभर थैमान घातलेल्या कोरोना मातेचं मंदीर जमीनदोस्त

दिलासादायक! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात आज एकाही कोरोना रूग्णाचा मृत्यु नाही

महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांची संख्या 10 हजारांच्या घरात; पाहा दिलासादायक आकडेवारी

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More