Top News महाराष्ट्र मुंबई

“आमची सत्ता असताना इंधन दरवाढीवरून टिव टिव करणारे अमिताभ आणि अक्षय गप्प का?”

Photo Credit- Facebook/ Amitabh Bachhan & Akshay Kumar & Nana Patole

मुंबई | सध्या पेट्रोलच्या दराने काही राज्यांत 100 ओलांडली आहे तर काही राज्यांत आता काहीच दिवसात गाठण्याची शक्यता आहे. जनतेच्या मनातसुद्धा इंधन दरवाढीवरून केंद्र सरकारविरोधात आक्रोश आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रसनेही केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रसचे नवे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सुपरस्टार अक्षय कुमार आणि महानायक अमिताभ बच्चन यांच्यावर टीका केली आहे.

युपीएचे सरकार लोकशाही मार्गाने चालणारं सरकार होतं म्हणून 70 रुपये लि.पेट्रोल झालं होतं. त्यावेळी अभिनेते अमिताभ बच्चन, अक्षयकुमार आणि इतर सेलिब्रिटींनी इंधन दरवाढीविरोधात ट्विट करून संताप व्यक्त केला होता. आता पेट्रोलने शंभरी गाठली, मोदी सरकारच्या हुकूमशाही विरोधात बोलण्याची हिम्मत नाही?, असं म्हणत नाना पटोलेंनी अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्यासह इतर सेलिब्रिटींवर निशाणा साधला आहे. गांधी भवन येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सध्या पेट्रोल प्रति लिटर 96 रुपये तर डिझेल 86 रुपये लिटर झालं आहे तर घरगुती गॅस सिलेंडर 800 रुपये झाला आहे. कोराना संकटामुळे लाखो लोकांचे रोजगार हिरावले गेले आहेत. नोकरदार, मध्यम वर्गीयांनाही जगणं कठीण झालं आहे. त्यात दरवाढ करून मोदी सरकारने लूट चालवली असून सरकारने इंधन दरवाढ तात्काळ मागे घ्यावी अन्यथा काँग्रेस रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा इशारा नाना पटोलेंनी दिला आहे.

दरम्यान, नाना पटोलेंनी यावेळी मोदी सरकारला इंधन दरवाढीबाबत तुम्ही पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करणार होतात, हे आश्वासनही आठवून दिलं.

 

थोडक्यात बातम्या- 

भारतातील ‘ही’ आहे सर्वात सुरक्षित कार… वाचा सविस्तर

गजानन मारणे जेलमधून सुटलाच कसा- देवेंद्र फडणवीस

पत्नीने केली चौथ्या पतीची हत्या, कारण ऐकूण तुमचीही झोप उडेल!

नेत्याच्या गाडीत ड्रग्ज ठेवत रचला कट पण…; मुंबई पोलिसांनी केला पर्दाफाश!

रेल्वेत आढळली बेवारस बॅग, खोलून पाहताच अधिकाऱ्यांचे डोळे झाले पांढरे!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या